मराठी बातम्या /बातम्या /Viral /

काही तासातच करोडपती झाला रुग्णवाहिका चालक; वाचून तुम्हीही म्हणाल 'नशीब असावं तर असं'

काही तासातच करोडपती झाला रुग्णवाहिका चालक; वाचून तुम्हीही म्हणाल 'नशीब असावं तर असं'

Ambulance Driver Win Lottery : सकाळी खरेदी केलेल्या तिकीटाचा निकाल जाहीर झाला तेव्हा दुपारी त्यांना समजलं की त्यांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत

Ambulance Driver Win Lottery : सकाळी खरेदी केलेल्या तिकीटाचा निकाल जाहीर झाला तेव्हा दुपारी त्यांना समजलं की त्यांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत

Ambulance Driver Win Lottery : सकाळी खरेदी केलेल्या तिकीटाचा निकाल जाहीर झाला तेव्हा दुपारी त्यांना समजलं की त्यांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत

    नवी दिल्ली 13 डिसेंबर : शेख हिरा एक रुग्णवाहिका चालक आहेत. ते पश्चिम बंगालमधील रहिवासी आहेत. त्यांनी सकाळी 270 रुपयांचं लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. मात्र आपण दुपारपर्यंत करोडपती होणार आहोत (Driver Became Crorepati), याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. सकाळी खरेदी केलेल्या तिकीटाचा निकाल जाहीर झाला तेव्हा दुपारी त्यांना समजलं की त्यांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत (Ambulance Driver Win Lottery of 1 Crore). शेख म्हणाले की आता ते आपल्या आजारी आईवर चांगल्या रुग्णालयात उपचार करू शकतील. तसंच राहण्यासाठी चांगलं घरही बांधतील. बाथरूममध्ये सापडला करोडोंचा खजिना; पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही मिळालेल्या माहितीनुसार, शेख हिरा पश्चिम बंगालच्या पूर्व बर्धमान जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जेव्हा त्यांनी 1 कोटीची लॉटरी लागली तेव्हा ते इतकं घाबरले की त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. शेख यांना हे लॉटरी तिकीट हरवेल अशी भीती होती. यामुळे शक्तीगढ पोलीस या व्यक्तीला घरी सोडवण्यासाठी गेले. सोबतच पोलिसांची एक टीमही या व्यक्तीच्या घरी तैनात करण्यात आली. या व्यक्तीची आई वारंवार आजारी असते. त्यामुळे आईच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. मात्र आता अचानक नशीब पालटल्याने आपल्या आईवर चांगल्या रुग्णालयात उपचार करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. शेख यांनी सांगितलं की मी नेहमीच जॅकपॉट जिंकण्याचं स्वप्न पाहायचो आणि यासाठी लॉटरीचं तिकीट घ्यायचो. अखेर माझं नशीब पालटलं. या पैशांचा काय करणार, असा सवाल केला असता त्यांनी सांगितलं की मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. आता माझ्या आर्थिक अडचणी दूर होतील. आता मी आईवर चांगल्या रुग्णालयात उपचार करू शकेल आणि एक चांगलं घर बांधेल. याशिवाय सध्या काही विचार केला नसल्याचं त्यांनी सांगितलं. 3 वर्षांपूर्वी निधन झालेले वडील अचानक Google Map वर दिसले; पाहून शॉक झाली महिला हे लकी लॉटरी तिकीट विकाऱ्या बेशेख हनीफ यांनी सांगितलं, की लॉटरी तिकीटच्या या बिझनेसमध्ये मी अनेक वर्षांपासून आहे. अनेक लोक माझ्या दुकानातून तिकीट विकत घेतात. मात्र, फार कमी लोकच लॉटरी जिंकतात. आजपर्यंत माझ्या दुकानातून तिकीट खरेदी केलेल्या कोणाचंच असं नशीब उजाडलं नव्हतं, असंही त्यांनी सांगितलं. जॅकपॉट विनरने माझ्या दुकानातून तिकीट खरेदी केलं, याचा खूप आनंद असल्याचं त्यांनी म्हटलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Lottery, Viral news

    पुढील बातम्या