Home /News /viral /

Amazon ने तयार केली अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार; विशेष म्हणजे गाडीला स्टिअरिंग नाही

Amazon ने तयार केली अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार; विशेष म्हणजे गाडीला स्टिअरिंग नाही

ताशी 75 मैल म्हणजेच 120 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगानं ही गाडी धावू शकते.

    नवी दिल्ली, 19 डिसेंबर : जगभरात सध्या प्रदूषण आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळं आणि टंचाईमुळं इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric vehicle) वापरामध्ये वाढ झाली आहे. अनेक कंपन्या यावर काम करत असून विना ड्रायव्हरच्या गाड्या देखील लवकरच पाहायला मिळणार आहे. अमेझॉनने (Amazon) देखील यामध्ये उडी घेतली असून त्यांनी एक युनिक अशी सेल्फ ड्रायव्हिंग टॅक्सीचा प्रोटोटाइप तयार केला आहे. सध्या याची टेस्टिंग सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अमेझॉननी एक स्टार्टअप झूक्स खरेदी केलं होतं त्यावरूनच या प्रोजेक्टचं आणि गाडीचं नाव झूक्स ठेवण्यात आलं आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को(San Francisco) आणि लास वेगासमध्ये (Las Vegas) याचे टेस्टिंग सुरु असून लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ही गाडी खूपच खास असून याला स्टिअरिंग नाही. या गाडीमध्ये चार जण बसू शकतात. इलेक्ट्रिक गाडी असल्याने याला जबरदस्त बॅटरी देण्यात आली नाही. ताशी 75 मैल म्हणजेच 120 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगानं ही गाडी धावू शकते. बॅटरी बॅकअप हा 16 तासांचा असून नॉनस्टॉप ही गाडी 16 तास धावू शकते. यासाठी यामध्ये 133 kWh ची बॅटरी दिली आहे. या गाडीच्या चाकांमुळे ती पार्क करण्यास देखील सोपी आहे. याचबरोबर गाडी पुढच्या आणि मागच्या दोन्ही दिशेने चालू शकते म्हणजे रिव्हर्स घेण्याची भानगडच नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाडीचा अपघात होऊ नये यासाठी देखील काळजी घेण्यात आली आहे. यासाठी गाडीमध्ये कॅमेरा, रडार आणि lidar sensors बसवले आहेत. यामुळं गाडी रस्त्यावर 360 डिग्री कोनांतून नजर ठेवू शकणार आहे. त्यामुळे रस्त्यात मध्ये माणूस, कुत्रं किंवा एखादी वस्तू आली तरीही ही गाडी ते सेन्स करून वेग कमी करेल किंवा थांबेल. या गाडीचं टेस्टिंग यशस्वी झालं तर लवकरच इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या यादीत या अद्भुत गाडीचा समावेश होणार आहे. याआधी देखील अनेक कंपन्यांनी आपल्या गाड्यांचं टेस्टिंग केलं असून या गाडीच्या जबरदस्त फीचरमुळं ही गाडी अल्फाबेटची Waymo, जीएमची Cruise तसेच उबेर आणि टेस्लाच्या गाडयांना टक्कर देऊ शकते. सध्या प्रोटोटाइप दिसत असला तरीही प्रत्यक्ष ही गाडी रस्त्यांवर धावू लागली तर एक नवलच होईल. अमेझॉन वेगवेगळ्या व्यवसायांत कार्यरत असून, संशोधनाधारित सेवा, वस्तू निर्माण करून त्या विकण्यावर त्यांचा भर असतो.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amazon

    पुढील बातम्या