• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अजबच! घटस्फोटानंतर महिलेने ठेवली Divorce Party; म्हणाली, 'आता मी स्वतंत्र.... '

अजबच! घटस्फोटानंतर महिलेने ठेवली Divorce Party; म्हणाली, 'आता मी स्वतंत्र.... '

सोनिया गुप्ता असं या महिलेचं नाव असून, 45 व्या वर्षी लग्नाला 17 वर्षे झाल्यानंतर तिनं आपल्या पतीला घटस्फोट दिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर- भारतीय संस्कृतीत (Indian Culture) लग्नाला (Marriage) विशेष महत्त्व आहे. विशेषतः स्त्रियांसाठी (Woman) लग्न अत्यावश्यक मानलं जातं. लग्नामुळे स्त्रीला स्थैर्य मिळतं असं मानलं जातं. त्यामुळे लग्न टिकवणं ही तिचीच जबाबदारी मानली जाते. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास घटना असते. मात्र कधीकधी लग्नानंतर आपण एकमेकांसाठी अनुकूल नाही, असं दोघांच्या लक्षात येतं आणि नातं बिघडतं. त्यांच्यात दुरावा निर्माण होतो मात्र अनेकदा कुटुंब, मुलं यांच्यासाठी तडजोड करून नातं टिकवलंही जातं, यासाठी अधिक दबाव स्त्रीवरच असतो. पण तो दबाव सहन न होऊन अखेर घटस्फोटाचा (Divorce) मार्ग स्वीकारला जातो. मात्र आजही आपल्या समाजात घटस्फोट म्हणजे वाईट विशेषतः स्त्रियांसाठी तर मोठं संकट अशी धारणा आहे. याला छेद देण्याचं धाडस एका महिलेनं दाखवलं आहे. तिनं घटस्फोटानंतर चक्क एक पार्टी (Party) करून आपला आनंद व्यक्त केला आहे. सोनिया गुप्ता असं या महिलेचं नाव असून, 45 व्या वर्षी लग्नाला 17 वर्षे झाल्यानंतर तिनं आपल्या पतीला घटस्फोट दिला आहे. घटस्फोट ही काही आनंदाची घटना नसते. त्यामुळे स्त्रीनं दुःखी राहिलं पाहिजे अशी समाजाची अपेक्षा असते, मात्र हे चुकीचं असून, आपण घटस्फोट घेतल्यानंतर आनंदी रहायचं आणि हा आनंद जाहीरपणे साजरा करायचा असं सोनियानं ठरवलं होतं. म्हणूनच तिनं ही घटस्फोट पार्टी (Divorce Party) ठेवली आणि त्यासाठी कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रपरिवाराला आमंत्रित केलं. या वेळी तिनं रंगीत ड्रेस (Colorful Dress) घातला होता आणि गळ्यात एक ‘फायनली डिव्होर्सड’ (Finally Divorced) असं लिहिलेला एक पट्टाही घातला होता. पाहुण्यांनादेखील तिनं झगमगत्या कपड्यांमध्ये येण्यास सांगितलं होतं. या पार्टीत तिनं खूप धमाल केली. (हे वाचा:खरंच की काय! साडी नेसल्यामुळे महिलेला रेस्टॉरंटमध्ये नाकारला प्रवेश, पाहा VIDEO) एका कंपनीत अकाऊंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या सोनियाचं 2003 मध्ये भारतात लग्न झालं होतं. त्यानंतर ती आपल्या पतीसह ब्रिटनमध्ये (Britain) वास्तव्यास होती. सोनिया तिच्या वैवाहिक जीवनात अजिबात आनंदी नव्हती. या नात्यात तिला तिचं स्वतंत्र अस्तित्वच उरलं नव्हतं. तिच्या मूळ स्वभावापेक्षा वेगळं तिला वागावं लागत असे. पूर्वीची आनंदी स्वभावाची सोनिया पूर्णतः बदलून गेली होती. तरीही तिनं काही वर्षे जुळवून घेतलं, पण नंतर मात्र तिनं पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तिनं आपल्या कुटुंबीयांना याबाबत सांगितलं तेव्हा त्यांनी घटस्फोटाला विरोधच केला; पण सोनियाच्या मित्रांनी आणि तिच्या दोन मुलांनी (Children) तिला पाठिंबा दिला. अखेर लग्नाच्या 17 वर्षांनंतर 2018 मध्ये तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आणि तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर, त्यांचा घटस्फोट मंजूर झाला. (हे वाचा:VIDEO - हंड्यासारखी डोक्यावर ठेवली बाईक, हातांनी न धरताच गाडीवर चढवली) बंधनातून मुक्त झाल्याचा आनंद प्रत्येकाला होत असतो. नको असलेल्या नात्याच्या जोखडातून मुक्त झाल्याचा आनंद स्त्रीनं साजरा करायचा नाही, ही संकुचित विचारसरणी असलेल्या भारतीय समाजात सोनियानं घटस्फोटाची पार्टी करून एका नवा पायंडा पाडला असून, अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे.
  First published: