मुंबई, 13 डिसेंबर : हिरवंगार किंवा बर्फाळ डोंगर, निळाशार समुद्र-आकाश, झुळूझुळू वाहणारी नदी, बर्फाचा पाऊस असं निसर्ग पाहायला कुणाला आवडणार नाही. उंच उंच इमारतीत सिमेंटच्या जंगलात राहणारे आपल्यासारखे लोक निसर्गाचं असं सुंदर दृश्य पाहण्यासाठी मुद्दामहून अशा ठिकाणी फिरायला जातात. निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटतात. पण निसर्ग इतकाच नाही. या निसर्गात असं बरंच काही आहे जे आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे (Amazing Nature Videos). ज्याचा कधी आपण विचारही केला नसेल असे अद्भुत चमत्कार पृथ्वीवर घडताना दिसतात (Shocking Nature Videos). निसर्गाच्या अशाच एका अद्भुत रूपाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Weird Natural Incidents Caught on Camera).
तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरला असाल पण कदाचित निसर्गाचं असं रूप तुम्ही कधीच पाहिलं नसावं. निसर्गाचं हे अनोखं असं रूप कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तुम्हाला प्रत्यक्षात हे दृश्य पाहायला मिळालं नसलं तरी आम्ही तुमच्यासाठी अशाच नैसर्गिक चमत्कारांचा व्हिडीओ दाखवणार आहोत. जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणचे हे व्हिडीओ आहेत. खरंतर व्हिडीओ पाहून असंही असू शकतं का? याचंच तुम्हाला आश्चर्य वाटेल. अगदी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.
व्हिडीओच्या सुरुवातीलाच एक खेकडा स्वतःला एका वाळूत कसं लपवतो ते दिसतं. यानंतर पुढे एका डोंगरावर बरीच झाडं आहेत आणि तिथली जमीन मात्र अशी हलताना दिसते. ही जमीन एका विशिष्ट पद्धतीने हलते आहे. श्वास घेताना जशी आपली छाती वर खाली होते, अगदी तशीच हालचाल या जमिनीची होताना दिसते आहे. जणू धरतीचं हृदयच धडधडतं आहे, असं हा व्हिडीओ पाहून वाटतं.
हे वाचा - या Photo मध्ये दडलेत 6 Christmas gift; तुम्ही शोधून दाखवलं तर...
त्यानंतर एका बर्फाळ ठिकाणावरील व्हिडीओ आहे. जिथं सुरुवातील एक व्यक्ती डोक्यावर हात ठेवून तो डोक्यापासून दूर नेते, त्यावेळी एक विशिष्ट आवाज येताना दिसतो. त्यापुढे तर आणखी एक हैराण करणारा व्हिडीओ आहे. ज्यात नळातून पाणी बाहेर आलं आहे. पण हे पाणी हलताना दिसत नाही म्हणजे एखादा पारदर्शक पाइप असावा तसंच हे पाणी दिसतं आहे. हे पाणी गोठलं आहे पण तरी जेव्हा त्या पाण्याला स्पर्श करायला जाल तेव्हा मात्र ते पाहण्यासारखं वाहताना दिसतं.
हे वाचा - काचेच्या पुलावरून चालताना उडाली भंबेरी, VIDEO पाहून येईल हसू
असे एक नाही तर बरेच शॉकिंग क्लिप या व्हिडीओत आहेत. फेसबुकवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. कोणत्या जादूपेक्षा हे कमी नाही, असंच सर्वांना वाटतं आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं आहे, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Viral, Viral videos