नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : कदाचित यापूर्वी कधीही तुम्ही असा फोटो (VIRAL PHOTO) पाहिला नसेल. एका हेरॉन पक्ष्याच्या पोटातून एक ईल साप (Snake Eel ) बाहेर पडताना या फोटोत दिसतोय. फोटोमधून हे समजतंय की शिकारी पक्ष्याने नुकताच तो पूर्ण साप जिवंत गिळला असावा. लाइव्ह सायन्सच्या एक रिपोर्टमधून कळले की मेरीलँडमधील एक इंजिनियर सॅम डेव्हिसने डेलवेअर किनाऱ्यावर असताना हा श्वास रोखून धरायला लावणारा फोटो काढला आहे. या हौशी फोटोग्राफरने हा फोटो वेळेत क्लिक केला आहे. यात असे दिसते आहे की पक्ष्याच्या पोटाला छिद्र पाडून सापाने आपलं डोकं आणि अर्धं शरीर बाहेर काढलंय आणि तो हवेत लोंबकळतोय. इतकं होऊनही तो पक्षी व्यवस्थितपणे उडत असल्यासारखे दिसत आहे.
लॉंग-रेंज फोटोग्राफीसाठी वापरली जाणारी टेलिफोटो लेन्सने त्याने हे अद्भुत क्षण क्लिक केले व ते करत असताना त्याने पहिले की त्या दृश्यानी अनेक शिकारी पक्षांचंही लक्ष वेधून घेतलं. तो म्हणाला, इतरांमध्ये गरुड आणि कोल्ह्यांनी हेरॉनचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यांना कदाचित अशी आशा वाटली की एकदा साप खाली पडला तर ते त्याला खाऊन टाकतील. या घटनेचं वर्णन करताना सॅमने सांगितले की सुरुवातीला त्याला असा विचार आला होता की त्या सापाने बगळ्याच्या गळ्याला चावा घेतला होता. तो पक्ष्यापासून सुमारे 68 ते 91 मीटर अंतरावर होता. तो म्हणाला, “हेरॉन काहीच वेगळ्या पद्धतीने वागत असल्याचे वाटत नव्हतं. म्हणून मी असा विचार केला की तो जिवंतच होता. आपण त्या सापाला फोटोमध्ये पाहू शकता, आपण त्याचे डोळेही पाहू शकाल."
हे ही वाचा-केळी खाण्यासाठी हत्तीनं अडवली बस, पुढे काय झालं पाहा VIDEO
सॅमने फोटो एडिट करत असताना आणखी एक गोष्ट पाहिली, त्याला लक्षात आले की सापाने खरोखरच पक्ष्याला कुठेच चावले नव्हते. तो सरळ त्या पक्ष्याच्या पोटाला फाडून बाहेर निघाला होता, आधी डोकं मग सगळं शरीर घेऊन.
कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन (CSIRO) येथे असलेल्या ऑस्ट्रेलियन नॅशनल फिश कलेक्शनमध्य काम करणारे इथिओलॉजिस्ट जॉन पोगोनोस्की यांनीही अद्भुत फोटोवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “फोटोमध्ये दिसणारे दृश्य भलतेच आणि खूपच आश्चर्यकारक दिसते. मला असे वाटतं की पक्षी प्रजातींमध्ये हे फारच दुर्मिळ किंवा फारच क्वचितच पाहिलं गेलं आहे, किमान माझ्या माहितीप्रमाणे तरी.”
|
||||