मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भारतातील 'या' ठिकाणी आहे एलियन्सचा वावर, येथे दडलंय मोठं रहस्य

भारतातील 'या' ठिकाणी आहे एलियन्सचा वावर, येथे दडलंय मोठं रहस्य

 एलियन्सविषयी तुम्ही अनेकदा काही ऐकलं असेल, पण तुम्ही कधी एलियन्स पाहिले आहेत का ? अनेकजण याचे उत्तर ‘नाही’ असे देतील.

एलियन्सविषयी तुम्ही अनेकदा काही ऐकलं असेल, पण तुम्ही कधी एलियन्स पाहिले आहेत का ? अनेकजण याचे उत्तर ‘नाही’ असे देतील.

एलियन्सविषयी तुम्ही अनेकदा काही ऐकलं असेल, पण तुम्ही कधी एलियन्स पाहिले आहेत का ? अनेकजण याचे उत्तर ‘नाही’ असे देतील.

    मुंबई, 18 ऑगस्ट-   एलियन्सविषयी तुम्ही अनेकदा काही ऐकलं असेल, पण तुम्ही कधी एलियन्स पाहिले आहेत का ? अनेकजण याचे उत्तर ‘नाही’ असे देतील. पण असे बोलले जाते की, भारतातील एका ठिकाणी नेहमीच दुसऱ्या ग्रहावरील जीव म्हणजेच एलियन्स येत-जात असतात. हे ठिकाण म्हणजे लडाख येथील ‘कोंगका ला पास’. वैज्ञानिकांसाठी हे ठिकाण नेहमीच एक रहस्य राहिलं आहे. लडाख हे त्याच्या सौंदर्यासोबतच एलियन्सच्या गूढतेमुळे चर्चेत असतं. येथे एक ठिकाण आहे, ज्याला ‘एलियन्सचा अड्डा’ म्हणून देखील ओळखलं जातं. लडाखच्या कोंगका ला पासमध्ये एक रहस्यमय जागा आहे. येथे एलियन्स दिसल्याचा दावा अनेकदा करण्यात आलाय. म्हणूनच या भागाला यूएफओचा अड्डा म्हणतात.कोंगका ला पास हा असा परिसर आहे, जिथे कोणीही राहत नाही. एलियन्स खरोखर येथे येतात की नाही, हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी 2004 मध्ये अभ्यास केला. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, अभ्यासादरम्यान लडाखच्या याच भागात एक रोबोट फिरताना दिसला. पण वैज्ञानिक तेथे जाताच, ती वस्तू गायब झाली होती. रहस्य कायम या रहस्यमय जागेबाबत वैज्ञानिकांची वेगवेगळी मते आहेत. काही वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, कोंगका ला पास हा जगातील सर्वांत जुना आहे. हा एक अतिशय मजबूत खडक आहे. यामुळे यूएफओ बेस (Unidentified Flying Objects Base) येथे असू शकतो. तर, काही वैज्ञानिकांचे म्हणणं आहे की, येथे एलियन्स किंवा यूएफओ यांचं कोणतंही अस्तित्व नाही. कारण येथे त्याबाबत कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. तसंच, या भागात एलियन्स दिसत असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर, 2012 मध्ये डीआरडीओ आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनने येथे एकत्र अभ्यास केला. तपास आणि संशोधन केल्यानंतरही दोन्ही संस्था कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. दरम्यान, कोंगकाला दर्रा येथे अनेकदा यूएफओ पाहिल्याचा दावा केला जातो. 2012 मध्ये भारतीय लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांनीही अशीच एक रहस्यमय गोष्ट पाहिल्याची पुष्टी केली होती. लष्कराने दिल्ली मुख्यालयाला पाठवलेल्या अहवालातदेखील त्या भागात यूएफओ दिसल्याचे म्हटले होते. हा परिसर भारत-चीन सीमेच्या नियंत्रण रेषेजवळ आहे. त्यामुळे येथे सर्वसामान्यांच्या ये-जा करण्यास बंदी आहे. मात्र, काही स्थानिक लोक म्हणतात की, यूएफओ भारत आणि चीन या दोन्ही बाजूने जमिनीवर येताना दिसले आहेत. दोन्ही देशांच्या लष्कराला याची जाणीव आहे. पण त्याचे सत्य काय आहे, हे आजपर्यंत गूढच आहे. (हे वाचा:OMG! महिलेची छाती पाहून डॉक्टरही झाले शॉक; विचित्र बदलाचं कारणही समजेना ) 24 जून 1947 रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील माउंट रेनियरजवळ नऊ हाय-स्पीड ऑब्जेक्ट्स प्रथमच उडताना दिसले होते. यावेळी लोकांना यूएफओबद्दल जागरूक करणं खूप महत्वाचं आहे, अशी घोषणा करण्यात आली होती. लोकांना दुसऱ्या ग्रहावर असणाऱ्या जीवसृष्टीबाबत माहिती देणं आवश्यक आहे, असंही म्हटलं होतं. आपल्या आकाशगंगेत पृथ्वीसारखे लाखो ग्रह असतील, असे वैज्ञानिकांचे मत असेल, तर त्यातील काही ग्रहांवर जीवसृष्टी असू शकते. या ग्रहांवरही मानवासारखे प्राणी आणि पक्षी असतील. कदाचित त्यांच्यापैकी काही पृथ्वीवरील मानवजातीपेक्षा कमकुवत असतील, तर काही मानवजातीपेक्षा अनेक पटीने बुद्धिमान आणि तंत्रज्ञानाने समृद्ध असतील. अशाच लोकांना वैत्रानिक एलियन्स असे म्हणतात.एलियन्स हा विषय नेहमीच गूढ राहिला आहे. खरचं एलियन्स आहेत का नाही, याविषयी विविध मतभेद आहे. पण भारतातील लडाखच्या कोंगकाला दर्रा याबाबतील नेहमीपासूनच वैज्ञानिकांसाठी एक रहस्य राहिला आहे.
    First published:

    Tags: Viral, Viral news

    पुढील बातम्या