Home /News /viral /

मोफत आणि मनसोक्त बीअर पिण्याची संधी; 'या' कंपनीला हवे आहेत अधिकृत बीअर टेस्टर; भरती सुरू

मोफत आणि मनसोक्त बीअर पिण्याची संधी; 'या' कंपनीला हवे आहेत अधिकृत बीअर टेस्टर; भरती सुरू

अनेकांसाठी ड्रीम जॉब असू शकेल अशी ही नोकरी एल्डी (Aldi) या प्रसिद्ध कंपनीने ऑफर केली आहे. ही कंपनी स्वतःसाठी अधिकृत बीअर टेस्टरच्या (Beer Tester) शोधात आहे.

    आजच्या काळात अनेक जण त्यांच्या नोकरीला (Jobs) कंटाळले आहेत. ते केवळ पैशांसाठी मनाविरुद्ध काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामात उत्साह दिसत नाही. गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक पैसा मिळावा, या उद्देशानं काही जण कंटाळवाण्या कामात गुंतलेले आहेत. तुम्हीदेखील अशांपैकी एक असलात, तर आज आम्ही तुम्हाला एका ड्रीम जॉबविषयी (Dream Job) सांगणार आहोत. या कामासाठी तासन् तास लॅपटॉपकडे टक लावून पाहण्याची गरज नाही. तसंच ग्राहकांना कन्व्हिन्स करावं लागणार नाही. केवळ एकच गोष्ट करावी लागेल, जी कदाचित तीव्र इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला करायला आवडेल. अनेकांसाठी ड्रीम जॉब असू शकेल अशी ही नोकरी एल्डी (Aldi) या प्रसिद्ध कंपनीने ऑफर केली आहे. ही कंपनी स्वतःसाठी अधिकृत बीअर टेस्टरच्या (Beer Tester) शोधात आहे. या टेस्टरला चवीची (Taste) उत्तम जाण असणं आवश्यक आहे, जेणेकरून तो बीअरच्या चवीचं तपशीलवार वर्णन करू शकेल. या तपशिलाच्या आधारे कंपनी सर्वोत्तम बीअर उत्पादित करून ती ग्राहकांना सर्व्ह करणार आहे. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला केवळ बीअरची टेस्ट घेऊन तिच्या चवीचा तपशील (Details) द्यावा लागणार आहे. (बापरे! 'बाबुरावची चड्डी' एवढी महाग, किंमत ऐकून लोकही चक्रावली) संधी गमावू नका काही रोमांचक करण्याची इच्छा असेल, तर एल्डी कंपनी अशा व्यक्तींना ही संधी देत आहे. परदेशातल्या सुपरमार्केटमध्ये एल्डी कंपनीचं नाव खूप प्रसिद्ध आहे. या कंपनीत अधिकृत बीअर टेस्टर हे पद रिक्त आहे. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला अतिशय साधं काम करावं लागणार आहे. ही कंपनी घरी बीअरच्या बाटल्या पोहोचवणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला प्रत्येक बीअरची टेस्ट अतिशय प्रामाणिकपणे करावी लागणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, "हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या पदावरच्या व्यक्तीच्या रिव्ह्यूनुसार वाइन टेस्टमध्ये बदल केले जाणार आहेत आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन ती त्यांना दिली जाणार आहे." असा करा अर्ज एल्डी कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. "या पदासाठी आम्ही अशा व्यक्तीच्या शोधात आहोत की जी खूप मेहनती आणि कर्तव्यकठोर आहे. या व्यक्तीनं चवीचा रिव्ह्यू (Review) एकदम प्रामाणिकपणे देणं गरजेचं आहे. प्रत्येक टेस्टरला दहा वेगवेगळ्या चवीच्या बीअर पाठवण्यात येतील. तुम्ही या जॉबसाठी स्वतःला परफेक्ट मानत असाल तर केवळ एल्डीच्या अधिकृत आयडीवर मेल पाठवावा आणि कंपनीनं तुमची निवड का करावी, याचा तपशीलदेखील त्यात लिहिलेला असावा. याशिवाय या ई-मेलमध्ये तुमच्या आवडीच्या बीअरचं नाव आणि तिच्या टेस्टविषयी माहिती द्यावी लागेल. याशिवाय तुमचं पूर्ण नाव, वय आदी माहिती आणि या पदासाठी तुम्ही योग्य कसे आहात, याबाबत सुमारे 150 शब्दांत टिपण द्यावं लागेल", असं कंपनीने म्हटलं आहे.
    First published:

    पुढील बातम्या