भंडारा, 4 जून : दारुचे व्यसन (Alocohol Addiction) ही आता नवी गोष्ट राहिली नाही. समाजातील वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना याचे व्यसन असते. अनेक तरुण मुले, तरुणी (Alcoholic Youngsters) देखील या व्यसनाच्या आहारी गेल्याची उदाहरणं आपण रोज पाहतो. मात्र, आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे
काय आहे प्रकार ?
भंडारा (Bhandara) जिल्ह्यात एका ठिकणी चक्क एक कोंबडा दारू (Drunk Cock) पितो. हो. कोंबडा दारू पितो. दारू घेतल्याशिवाय त्याला अन्न-पाणीही जात नाही. या कोंबड्यामुळे त्याच्या मालकाला आर्थिक भुर्दंड बसतो आहे. त्यामुळे सतत पडणारा आर्थिक भूर्दंड आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे त्यांना आता त्यांच्या दारुड्या कोंबड्याचे हे व्यसन सोडवायाचे आहे.
भंडाऱ्याजवळ पिपरी पुनर्वसन गावात भाऊ कातोरे नावाचे शेतकरी आहेत. भाऊ कातोरे यांना कुक्कुटपालन करण्याचा छंद असल्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रजातिचे कोंबडे आहेत. मात्र, सध्या ते आपल्या एका कोंबड्याच्या वाईट सवयीमुळे चिंतेत आहेत. भाऊ कातोरे आपल्या कोंबड्याला जबरदस्तीने पाणी पाजण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कोंबडा पाणी पित नाही.
भाऊ कातोरे हे विदेशी दारू घेऊ येतात. ती दारु पाण्यात मिसळवल्यानंतर या कोंबड्याला दिल्यावर तो ती दारू पितो. इतकेच नव्हे तर जेवणही करू लागतो. भाऊ कातोरे यांच्या या कोंबड्याला दारूचे व्यसन जडल्याचे पाहायला मिळते आहे. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो आहे.
रोज लागतो पेग
मागच्या वर्षी या कोंबड्या मरी रोग झाला होता. त्यामुळे तो काहीच खात पीत नव्हता. म्हणून त्याला काही महिने मोहफुलाची दारू पाजली गेली. यानंतर मोहफुलाची दारू मिळणे बंद झाल्यावर त्याला विदेशी दारू सुरू करण्यात आली. त्याला आता या विदेशी दारुचे व्यसन जडले आहे. त्यामुळे विदेशी दारूशिवाय तो काहीच खात पित नाही, अशी त्याची अवस्था झाली आहे. त्याला दररोज 45 मिलीचा पेग लागतो. याशिवाय अन्न-पाण्याला स्पर्शही करत नाही. 45 मिलीच्या कोंबड्याच्या या दारुच्या खर्चामुळे प्रत्येक महिन्याला त्याच्या मालकाला दोन हजार रुपये खर्च करावे लागत आहेत.
चप्प्ल वाचवण्याच्या नादात स्वतः चिखलाच्या दलदलीत अडकला व्यक्ती; क्षणात जमिनीत शिरला, Video
व्यसनमुक्तीचा प्रयत्न
या कोंबड्याचा मालक निर्व्यसनी आहेत. आता ते त्यांच्या कोंबड्याचे व्यसन सोडविण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांना दारू लपून आणण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कोंबड्याचे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी मालकाची पशुवैद्यकीय दवाखाण्यात पायपीट सुरू आहे. तर कोंबड्याच्या दारुच्या व्यसनामुळे त्याला कोणताही धोका नाही. उलट त्याच्या पोटातील जंतू मरत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.