मराठी बातम्या /बातम्या /Viral /दारू पिऊन फुल्ल टल्ली होऊन झोपणं महागात; महिलेला आता कापावा लागणार पाय

दारू पिऊन फुल्ल टल्ली होऊन झोपणं महागात; महिलेला आता कापावा लागणार पाय

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

दारू पिऊन झोपण्याचा असा दुष्परिणाम की महिलेवर आली पाय कापण्याची वेळ.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 25 मार्च : दारू पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे हे तर तुम्हाला माहिती आहेच. पण दारू पिण्याचा असा दुष्परिणाम ज्याचा विचार तुम्ही केलाही नसेल. एका महिलेला हे भोगावं लागतं आहे. दारू प्यायल्यानंतर एक चूक तिला चांगलीच महागात पडली आहे. भरपूर दारू पिऊन ती टल्ली झाली आणि त्यानंतर अशा पद्धतीने झोपली की तिच्या पायावर बेतलं. तिचे पाय कापण्याची वेळ ओढावली.

एका महिलेने सोशल मीडियावर आपल्या दारूच्या व्यसनामुळे काय झालं ते सांगितलं आहे. जुलिया एंडरसन असं या महिलेचं नाव आहे. 36 वर्षांच्या जुलियाने दारूमुळे आपण आपले  पाय गमावल्याचं ती म्हणाली. आता तुम्ही म्हणाल दारू आणि पायांचा काय संबंध आहे.

जुलिया खूप दारू प्यायली होती. त्यानंतर तिला झोप लागली. कित्येक तासांनंतर तिला जाग आली तेव्हा तिच्यासोबत भयंकर घडलं. ही महिला अशा स्थितीत झोपली होती की तिच्या पायातील रक्तप्रवाह थांबला. आता तिला तिचे पाय कापावे लागू शकतात, असं डॉक्टर म्हणाले.

बाबो! एक तोळा सोन्यापेक्षाही महाग दारूचा एक घोट; किमतीचा आकडा वाचूनच नशा चढेल

जुलिया म्हणाली, जवळपास 20 पेग दारू ती प्यायली. त्यानंतर तिला झोप येऊ लागली. तिला शुद्धच नव्हती. तिने आपले आपले पाय दुमडलं आणि तशीच झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तर तिचे पाय सूजले होते. कारण पायांना कित्येक तास रक्तपुरवठा झाला नाही. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं.

रुग्णालयात तिच्या कित्येक वैद्यकीय तपासण्या झाल्या. तेव्हा तिच्या पायांना रक्तपुरवठा न झाल्याचं निदान झालं. पूर्ण रात्र एकाच पद्धतीने झोपल्याने तिच्यावर अशी वेळ ओढावली. तिची सर्जरी करण्यात आली. पायांतील स्नायूंना चिर देण्यात आला आहे, जेणेकरून सूज कमी होईल आणि रक्ताच्या गुठळ्या कमी होती.  5 आठवडे तिला रुग्णालयात ठेवण्यात आलं.

आयला! तरुणाच्या पोटात दारूची बाटली, डॉक्टरही चक्रावले; पण आत गेली तरी कशी?

जुलियासोबत 2020 साली हे घडलं होतं. तीन वर्षांनंतरही ती आता नीट चालू शकत नाही. त्यामुळे लोकांना जागरूक करण्यासाठी म्हणून तिने आपली ही स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

First published:
top videos

    Tags: Alcohol, Lifestyle, Viral