मराठी बातम्या /बातम्या /Viral /जपानमध्ये विवाहित जोडपे वेगळे का झोपतात? लोकांनी सांगितली मनोरंजक कारणं

जपानमध्ये विवाहित जोडपे वेगळे का झोपतात? लोकांनी सांगितली मनोरंजक कारणं

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

तिथे असे का घडते... याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. जपानमध्ये, अनेक विवाहित जोडप्यांना असे वाटते की वेगळे झोपणे त्यांच्यासाठी चांगले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : सर्वत्र हे तर कॉमन आहे की, लग्नानंतर पती-पत्नी एकाच खोलीत झोपतात. हे फारच नैसर्गिक आहे. पण असं असलं तरी देखील जपानमध्ये परंपरा काहीशी वेगळी आहे. येथे विवाहित जोडपे स्वतंत्रपणे झोपतात. फक्त बेडवरच नाही तर बेडरूममध्येही ते वेगळे राहतात.

शेवटी, तिथे असे का घडते... याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. जपानमध्ये, अनेक विवाहित जोडप्यांना असे वाटते की वेगळे झोपणे त्यांच्यासाठी चांगले आहे.

लग्नासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं? सायन्स काय सांगतं?

अनेक प्रकारे, जपानमधील पती-पत्नीची जीवनशैली इतर देशांपेक्षा खूपच वेगळी आहे. अनेक लोक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. पती-पत्नी दोघेही काम करतात तेव्हा गोष्टी अधिक कठीण होतात, जसे की जपानमध्ये सामान्य होत आहे.

Quora वर लोकांनी या प्रश्नाची उत्तरे अतिशय मनोरंजक पद्धतीने दिली आहेत.

बंटी सिंग नावाच्या युजरने लिहिले आहे की, 'जपानमध्ये अधिकृतपणे लग्न झाल्यानंतरही पती-पत्नी एकत्र झोपत नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची झोप. तिथले लोक जेवढे महत्त्व त्यांच्या कामाला देतात, तेवढेच महत्त्व त्यांच्या झोपेला देतात. यामुळेच 'क्वालिटी स्लीपिंग'मुळे लग्न होऊनही लोक वेगळ्या खोलीत झोपतात. जोडीदाराच्या घोरण्यामुळे किंवा इतर कोणत्याही विचित्र सवयीमुळे त्यांची झोप उडू नये असे या देशातील जोडप्याचे मत आहे.

कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी

अचिंत नाथ सक्सेना यांनी लिहिले आहे की, 'विवाहित जोडप्याला एकाच पलंगावर झोपण्याची विधी पाश्चात्य देशांतून आली आहे जिथे लग्नाचा आधार शारीरिक संबंध आणि नातेसंबंध आहे. पूर्वेकडील देशांमध्ये जेथे विवाह म्हणजे वैयक्तिक नातेसंबंध तसेच कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या आहे.

तेथे विवाहित जोडप्याने एकत्र राहण्यासाठी एकच बेड शेअर करणे बंधनकारक नाही. भारतातही पारंपरिक विचारसरणीच्या कुटुंबात पती-पत्नी एकाच पलंगावर झोपलेले आढळणार नाहीत.

हे असं असलं तरी देखील लोकांनी दिलेले हे तर्क आहेत. ही माहिती किती खरी आहे, याबाबत कोणतीही माहिती अद्यापतरी समोर आलेली नाही.

First published:
top videos

    Tags: Relationships, Social media, Top trending, Viral, Wife and husband