नवी दिल्ली, 26 जानेवारी : दैनंदिन जीवनात स्वयंपाक बनवताना कांदा आणि लसूण यांचा हमखास वापर केला जातो. लोक आवर्जुन भाज्यांमध्ये या गोष्टीचा समावेश करतात. यामुळे जेवनाची चव वाढते. हे खाण्याचे अनेक फायदेदेखील आहेत. मात्र असे काही लोक आहेत जे या गोष्टींचा वापर अजिबात करत नाहीत. मात्र असं एक गाव आहे जिथे गेल्या 40 ते 45 वर्षांपासून कांदा लसूण वापरला नाहीये. यामागे नक्की काय कारण आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
ज्या गावातील लोक लसूण आणि कांद्यापासून दूर राहतात हे गाव बिहारमधील जेहानाबादजवळ आहे. हे गाव जेहानाबाद जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलेमीटरच्या अंतरावर आहे. त्रिलोकी बिघा असं या गावाचं नाव आहे. या गावात सुमारे 30 ते 35 घरे आहेत. या ठिकाणी सर्व घरांमध्ये कांदा-लसूण खाण्यास सक्त मनाई आहे. येथील लोक कांदा लसूण अजिबात खात नाही.
हेही वाचा - मेट्रोतील मंजुलिका पाहून प्रवाशांच्या मनात भरली धडकी, Video पाहून नेटकरी थक्क
त्रिलोकी बिघा या गावतील मोठी असलेली लोकं म्हणजेच वडिलधारी असलेली माणसं सांगतात, सुमारे 40 ते 45 वर्षापूर्वी या गावात लोकांनी कांदा लसूण खाण्यास बंद केलं होतं. लोक ही परंपरा बऱ्याच काळापासून पाळत आहे. या गावातील ठाकूरबाडी मंदिरामुळे त्यांनी कांदा लसूण खाण्यास सोडलं आहे. जेव्हा लोकांनी ही परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या घरात अनुचित घटना घडण्यास सुरुवात झाली. या नंतर लोकांनी कांदा लसूण खाण्यास सक्त मनाई घातली. याशिवाय ते या गोष्टींची खरेदीही करत नाहीत.
त्रिलोकी बिघा या गावामध्ये कांदा लसूणच नाही तर मांस आणि दारु या गोष्टींवरही सक्त मनाई आहे. लोक या गोष्टी खाण्यासही घाबरतात. त्यांच्या मनात भिती निर्माण झाली असून लोकांनी अनेक वर्षांपासून या गोष्टींना हातही लावला नाही. ही गोष्ट ऐकून अनेक लोक थक्क झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Top trending, Viral, Viral news