मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रेकॉर्ड ब्रेक! हजार नाही तर कोट्यवधीला विकली गेली मेंढी, तिचे वैशिष्ट्य जाणून तुम्ही व्हाल थक्क

रेकॉर्ड ब्रेक! हजार नाही तर कोट्यवधीला विकली गेली मेंढी, तिचे वैशिष्ट्य जाणून तुम्ही व्हाल थक्क

सर्वात महागडी मेंढी

सर्वात महागडी मेंढी

हे ऑस्ट्रेलियामधील प्रकरण आहे. जिथे काही लोकांनी मिळून एक मेंढी दोन कोटी रुपयांना विकत घेतली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 3 ऑक्टोबर : प्राण्यांसंबंधीत अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. ज्यामध्ये तुम्ही प्राण्यांचे क्यूट किस्से, तसेच त्यांच्यामधील वैशिष्यांबद्दल ऐकलं असेल, ज्यामध्ये घोडा, कुत्रा, बैल, मांजर यांसारख्या प्राण्यांचा समावेश असेल. परंतू आज आम्ही ज्या प्राण्याबद्दल बोलणार आहोत, तो आहे एक मेंढी. या मेंढीची किंमत इतकी आहे की, तुम्हाला जाणून विश्वास बसणार नाही.

हे ऑस्ट्रेलियामधील प्रकरण आहे. जिथे काही लोकांनी मिळून एक मेंढी दोन कोटी रुपयांना विकत घेतली आहे. खरंतर मेंढीची किंमत एवढी ऐकून तिच्या मालकालाही सुरुवातीला विश्वास बसला नाही.

मेंढ्यांचे मालक ग्रॅहम गिलमोर म्हणाले की, त्यांच्या मेंढीला एवढी मोठी रक्कम मिळेल याचा त्यांनी अजिबात विचार केला नव्हता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याची एवढी मोठी किंमत का?

हे वाचा : ''असे घाला अंडरगार्मेंट्स...'' पाकिस्तानी एअरलाइंसकडून क्रू मेंबर्ससाठी अनोखा नियम

खरंतर ऑस्ट्रेलियन व्हाईट मेंढी ही मेंढ्यांची एक विशेष जात आहे, ज्याला जास्त मागणी आहे कारण त्यांच्याकडे असलेले जाड फर फारच कमी प्रमाणात आढळते आणि हे लोकांसाठी चांगले आहे, कारण सध्या हे फर काढण्यासाठी लोक मिळत नाहीत. तसेच या विशिष्ट जातीच्या मेंढ्यांचा वापर मांसासाठी केला जातो.

ऑस्ट्रेलियातील सेंट्रल न्यू साउथ सेलमध्ये विकल्या गेलेल्या या मेंढ्याने गेल्या वर्षीचा विक्रम मोडला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2021 मध्ये एक मेंढी सुमारे 1.35 कोटी रुपयांना विकली गेली होती. हे आकडे पाहून, ऑस्ट्रेलियामध्ये मेंढीपालन व्यवसाय किती उंचीवर आहे हे समजू शकते.

सिंडिकेटच्या एका सदस्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ज्या मेंढ्यांच्या अंगावर फर कमी आहे, ते ऑस्ट्रेलियन परिस्थितीत अगदी योग्य आहेत. या मेंढ्या सांभाळायला अतिशय सोप्या असून त्यांची वाढ इतर मेंढ्यांच्या तुलनेत खूप चांगली होते.

हे वाचा : मनीमाऊ ऑन मिशन, चिमुकली बाल्कनीजवळ येताच करु लागली अशी गोष्ट, Video पाहून तुम्ही कराल कौतुक

गिलमोर येथील या मेंढीच्या आनुवंशिकतेचा वापर केल्यास इतर मेंढ्यांच्या जाती सुधारण्यास मदत होईल, असे खरेदीदारांनी सांगितले. ज्यामुळेच या मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे आणि त्यामुळेच काही विशिष्ट मेंढ्यांना जास्त पैसे देऊन विकत घेतले जाते.

First published:

Tags: Social media, Top trending, Viral news