मुंबई 2 सप्टेंबर : जगात अनपेक्षित आणि अकल्पित गोष्टी ह्या नेहमीच घडत असतात. आजवर अनेक अनाकलनीय घटना (Unexpected Events) घडल्याची उदाहरणं आहेत. ज्या गोष्टी मानवी बुद्धीच्या पलीकडच्या आहेत त्या दैवी ह्या वर्गात मोडतात. पण काहीवेळा सामान्य माणसं काहीतरी अनाकलनीय गोष्टी करतात तेव्हा कुणाचे काहीच चालत नाही. अशीच एक घटना युनायटेड किंग्डममधील मॅंचेस्टर शहरात घडलीय. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
युनायटेड किंग्डम मधील मॅंचेस्टर शहरातल्या फेयरफिल्ड स्ट्रीटवर चक्रावून टाकणारा जाहिरातीचा फलक (Advt. Billboards) लावण्यात आल्याचं दिसून आलंय. हा जाहिरातीचा बोर्ड जाणार्या-येणार्याचं लक्ष वेधून घेतोय. अँड्र्यु ब्लोच यांनी ट्विटर हँडलवरून या बोर्डाचा फोटो शेअर केला आहे.
ह्या लक्षवेधी जाहिरातीचा मजकूर फारच मजेशीर आहे. काळी बॅकग्राउंड असलेल्या या बोर्डावर पांढऱ्या अक्षरांत ‘मनोरुग्ण हवेत- तुम्हाला माहिती आहे कुठे अर्ज करायचा’ (Psychic Wanted – You know where to apply) असं लिहिलंय. त्या पुढे हिरव्या रंगाचा वरच्या दिशेने एक टोक असलेला त्रिकोणही छापलाय.
कॉन्टॅक्ट साईनेज कंपनी मंटोमिडिया (Mantomedia) ने मॅंचेस्टर इव्हिनिंग ह्या वृत्तपत्राला सांगितलं की, एका अज्ञात माणसाने काही रक्कम दिली आणि बोर्डवर दिसणारी अल्पशी माहिती दिली. अज्ञात व्यक्तीने सांगितलं की, योग्य व्यक्तीला कधी, कुठे आणि कसा संपर्क करायचा हे आपोआपच समजेल.
हा बोर्ड 18 ऑगस्ट 22 या दिवशी रस्त्यावर लावण्यात आला. मंटोमिडिया कंपनीचे स्टीव बॅक्स्टर म्हणाले, “सुरुवातीला आम्हाला हा सगळा वेडगळपणाच (Madness) वाटला, पण जाहिरात देणाऱ्या व्यक्तीनं त्याचं गांभीर्य समजवून सांगितलं. अशी जाहिरात केल्यावरच आपल्याला खरी सायकिक व्यक्ती भेटेल असा विश्वास त्यांना होता. एका बनावट सायकिक व्यक्तीनं फसवल्यामुळे आपण खऱ्या सायकिक व्यक्तीच्या शोधात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.’
Spotted in Manchester. Psychic wanted. pic.twitter.com/ID9UpH2xVo
— Andrew Bloch (@AndrewBloch) August 23, 2022
अशाच स्वरूपाची एक घटना अमेरिकेतील न्यूजर्सीत घडली होती. एका महिलेने आपल्या मुलीला डॉक्टरेट झाल्याबद्दल अभिनंदनच्या शुभेच्छा देण्यासाठी होर्डिंग लावलं होतं. केंड्र बसबी ह्या महिलेला आपल्या मुलीचा अभिमान वाटल्याने तिने ही आनंदाची बातमी संपूर्ण शहराला सांगण्याचं ठरवलं आणि अशा स्वरूपाचा बोर्ड लावला. ज्यासाठी तिने 1250 अमेरिकी डॉलर्स मोजले होते.
हे वाचा : तीन कोटींच्या आलिशान घरातलं `हे` वास्तव पाहून महिलेला बसला धक्का
या महिलेने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये तिच्या मुलीला उद्देशून लिहिलं होतं, ‘तुझ्या देदीप्यमान यशाने माझा उर भरून आलंय आणि मला तुझा अभिमान वाटतोय. तू अशीच चमकत रहा. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते,’ डॉ. क्रिस्टिन एस स्मॉल”.
अशा अनाकलनीय घटनांच्या लोकांचं लक्ष आपल्याकडे लगेचच खेचतात आणि त्या व्हायरलही होतात, त्याचंच हे एक उदाहरण.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Photo viral, Shocking news, Top trending, Viral news