मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चोरीची तपासणी करायला शाळेत गेले, पण दुसरंच काम करु लागले पोलीस; पाहून सर्वांनाच वाटलं आश्चर्य

चोरीची तपासणी करायला शाळेत गेले, पण दुसरंच काम करु लागले पोलीस; पाहून सर्वांनाच वाटलं आश्चर्य

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आपल्या समोर बऱ्याचदा असे काही प्रकरण येतात, ज्याबद्दल ऐकून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आहेत. ते एका पोलिसाचं...

  मुंबई 22 सप्टेंबर : आपल्या समोर बऱ्याचदा असे काही प्रकरण येतात, ज्याबद्दल ऐकून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आहेत. ते एका पोलिसाचं, खरंतर एक पोलीस अधिकारी चोरीचा तपास करण्यासाठी शाळेत आले होते. परंतू ते सोडून हे अधीकारी शाळेतील मुलांना शिकवू लागले. ज्यामुळे तेथील शिक्षकांना देखील धक्का बसला आहे. हे प्रकरण यूपीच्या कुशीनगर जिल्ह्यातील आहे. येथील सेमरा गावात असलेल्या उच्च प्राथमिक शाळेत झालेल्या चोरीचा प्रकार घडला होता, तेथे तपास करण्यासाठी आलेले इन्स्पेक्टर अतुल कुमार आपल्या आतील शिक्षकाला थांबवू शकले नाहीत आणि त्यांनी वर्गात जाऊन मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्यांनी खरंतर एखाद्या शिक्षकाप्रमाणेच मुलांना शिकवले, त्यांना प्रश्न विचारले, उत्तर देखील अगदी सोप्या पद्धतीने शिकवून सांगितलं. हे अधिकारी गणित शिकवू लागले आणि याचे प्रश्न सोडवण्याचे तंत्रही मुलांना सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं. ज्यामुळे मुलं देखील खूश झाले. त्यावेळी कोणीतरी त्यांचा व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हायरल झाल्यानंतर लोक त्याचे कौतुक करत आहेत. हे वाचा : आईकडूनच मुलांच्या जीवाशी खेळ, पाहून अंगावर उभा राहिल काटा; VIDEO VIRAL खरंतर कप्तानगंज परिसरातील सेमरा गावात असलेल्या उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी चोरी झाली, याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून कप्तनगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षण अतुल कुमार मुलांना शिकवताना
  उपनिरीक्षण अतुल कुमार मुलांना शिकवताना
  मंगळवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिकारी अतुल कुमार शाळेत पोहोचले. इकडे वर्गात शिकणारी मुले पाहिल्यावर इन्स्पेक्टर होण्यापूर्वी शिक्षकाची जबाबदारी पार पाडलेले अतुल कुमार स्वतःला रोखू शकले नाहीत. इन्स्पेक्टरच्या गणवेशात, हातात खडू घेऊन, ते मुलांना गणिताचे प्रश्न सोडवण्याची सोपी पद्धत शिकवू लागले. सुमारे एक तासाचा त्यांचा हा क्लास पार पडला, ज्यानंतर तेथून निघताना इन्स्पेक्टर अतुल कुमार यांनीही मुलांना शिकवण्यासाठी पुन्हा येण्याचे आश्वासन दिले. उच्च प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, शाळेत पोलिसांना बघून सुरुवातीला ते घाबरले होते, पण जेव्हा त्यांनी आम्हाला शिकवायला सुरुवात केली तेव्हा असे वाटले की ते इन्स्पेक्टर नसून शिक्षक आहेत. त्याने आम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करायला शिकवले जे आम्हाला चांगले समजले. हे वाचा : हॉटेलमध्ये GF सोबत रोमान्स करत होता नवरा; बायकोने रंगेहाथ पकडून तिथंच दोघांना...; पाहा VIDEO विद्यार्थ्यांनी सांगितले की, आजपर्यंत आम्हाला पोलिसांना पाहून भीती वाटायची आणि आधिकारी शाळेत येताच आम्हाला भीती वाटू लागली. पण ते म्हणाले, घाबरू नका, मी तुम्हाला शिकवायला आलो आहे. त्यानंतर त्यांनी गणिताचे प्रश्न समजावून सांगितले.
  Published by:Devika Shinde
  First published:

  पुढील बातम्या