मराठी बातम्या /बातम्या /Viral /हिमवादळात अडकलेल्या वृद्धाची जगण्यासाठी धडपड; असा वाचवला स्वतःचा जीव

हिमवादळात अडकलेल्या वृद्धाची जगण्यासाठी धडपड; असा वाचवला स्वतःचा जीव

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

तुम्ही संघर्ष आणि इच्छाशक्तीच्या अनेक कथा वाचल्या असतील आणि एखाद्या मोठ्या आपत्तीत लोक त्यांचे प्राण कशा पद्धतीनं वाचवतात याविषयी देखील ऐकलं, असंच प्रकरण समोर आलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : अविरत संघर्ष, कठोर परिश्रम आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतंही कठीण काम सहजपणे यशस्वी होऊ शकतं. या गोष्टी केवळ कामाच्या बाबतीत नाही तर रोजच्या जीवनातही उपयुक्त ठरतात. कठीण परिस्थितीत हार न मानता इच्छाशक्तीच्या जोरावर तिचा सामना केला तर यश मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते. अमेरिकेतील 81 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीने प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर एका भीषण संकटाचा सामना केला आणि त्या संकटातून ती सहीसलामत बाहेर पडली आहे. सोशल मीडियावर या वृद्ध व्यक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. हिमवादळात अडकलेल्या या व्यक्तीने सात दिवस मृत्यूशी सामना केला आणि त्यातून ती जिवंत परतली आहे.

    तुम्ही संघर्ष आणि इच्छाशक्तीच्या अनेक कथा वाचल्या असतील आणि एखाद्या मोठ्या आपत्तीत लोक त्यांचे प्राण कशा पद्धतीनं वाचवतात याविषयी देखील ऐकलं, वाचलं असेल. काही वेळा या गोष्टी नशिबावर अवलंबून असतात, परंतु, लोकांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणे सोडू नये. याचे एक जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

    सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य की अयोग्य?

    जेरी जॉरेट नावाची 81 वर्षांची वृद्ध व्यक्ती हिमवादळात अडकली. या व्यक्तीने तब्बल सात दिवस जिवंत राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि अखेरीस ती या आपत्तीतून सहीसलामत बाहेर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेरी हे गणिताचे प्राध्यापक आणि नासाचे निवृत्त कर्मचारी आहेत. हिम वादळातून जिवंत बाहेर पडल्यावर त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

    अमेरिकेतील कॉलिफोर्निया भागात ही घटना घडली आहे. अमेरिकी माध्यमातील वृत्तानुसार, जेरी जॉरेट हे 24 फेब्रुवारीला कॅलिफोर्नियातील बिगपाइन येथून नेवाडातील गार्डनरव्हिले येथे जात होते. यादरम्यान अचानक हवामान खराब झाले आणि वाटेत बर्फवृष्टी सुरू झाली. हवामान इतके खराब झाले की हिमवादळ आले. जेरीची एसयुव्ही गिल्बर्ट पासत्या मधोमध बर्फाच्या ढिगाऱ्यात अडकली आणि अथक प्रयत्न करूनही ते तिथून बाहेर पडू शकले नाहीत.

    शेवटी ते गाडीत बसून राहिले आणि बर्फवृष्टी थांबण्याची वाट पाहू लागले. पण बराच वेळ होऊन गेला तरी बर्फवृष्टी थांबली नाही. हळूहळू त्यांची गाडी बर्फाच्या ढिगाऱ्याखाली रुतत गेली आणि त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिकट होत गेली. ते एक आठवड्यापर्यंत गाडीत अडकून राहिले.

    या नैसर्गिक आपत्तीतून आपली लवकर सुटका होत नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी काही ट्रिक वापरण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांनी थोडा स्नॅक्स खाण्यास सुरुवात केली. गाडीत उष्णता राहावी आणि स्वतःला उबदार वाटावे यासाठी त्यांनी बॅटरी पॉवरचा वापर सुरू ठेवला. तसेच त्यांनी अधूनमधून कँडी आणि क्रोइसँट खाल्ले.

    काही वेळा त्यांनी गाडीची काच उघडून बाहेरील बर्फ देखील खाल्ला. शेवटी सात दिवसांनंतर त्यांचा काउंटी शेरीफ कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क झाला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांचा शोध घेऊन त्यांची सुटका केली. या वृद्ध व्यक्तीची जगण्यासाठी धडपड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. जेरीची जगण्यासाठीची धडपड अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

    First published:

    Tags: Shocking, Social media, Top trending, Videos viral, Viral