मराठी बातम्या /बातम्या /Viral /'या' तलावात जाताच प्राणी 'दगड' होतात, तुम्ही येथे गेलात तर चुकूनही लावू नका हात

'या' तलावात जाताच प्राणी 'दगड' होतात, तुम्ही येथे गेलात तर चुकूनही लावू नका हात

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

हा तलाव दिसायला लाल आहे आणि लोकांना तो पाहताच क्षणी सुंदर वाटतो, पण या सुंदरते मागे रहस्य लपलंय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा अशा काही घटना घडतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. आपलं जग खरंतर विचित्र गोष्टींनी भरलेलं आहे. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवलात तरी ठिक आणि नाही ठेवलंत तरी ठिक, पण अजूनही अशा गोष्टी आहेत, ज्याची उत्तर शास्त्रज्ञांकडे देखील नाहीत.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र तलावा विषयी सांगणार आहोत. हा तलाव रक्तासारखा लाल असून त्यात जाणारे जीव हे दगडाचे बनतात. हो तुम्ही बरोबर ऐकलंत, यात कोणीही गेलं तरी तो दगडाचा होतो.

प्रवाशांनी भरलेली ट्रेन बोगद्यात शिरताच गायब, याचं गुढं आजपर्यंत उलगडलं नाही

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, हा तलाव आफ्रेकेतील टांझानियामधील आहे, जे प्राण्यांना दगड बनवतात. हा तलाव दिसायला लाल आहे आणि लोकांना तो पाहताच क्षणी सुंदर वाटतो, पण या सुंदरते मागे रहस्य लपलंय.

जेव्हा लोकांना याच्याशी संबंधित एक मोठं रहस्य कळतं तेव्हा त्यांच्या संवेदनाच उडून जात आहेत. आम्ही नॅट्रॉन लेकबद्दल बोलत आहोत.

या तलावाची pH पातळी 10.5 म्हणजेच त्यात अल्कधर्मी पाणी आहे. जर कोणी चुकून या पाण्यात गेला तर त्याची त्वचा आणि डोळे जळजळू लागतात. या तलावाची pH पातळी सोडियम कार्बोनेट आणि इतर खनिजांमुळे इतकी जास्त आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की एक काळ असा होता जेव्हा इजिप्शियन लोक ममी बनवण्यासाठी सोडियम कार्बोनेट वापरत होते. तसाच काहीसा घटक या पाण्यात आहे, जो सगळ्या सजीवांना हळूहळू दगड बनवू शकतो.

प्राणी दगड कसे होतात?

या तलावात एखादा प्राणी गेला की त्याचे कॅल्सीफिकेशन सुरू होते, म्हणजेच कॅल्शियमचे क्षार त्याच्या शरीरातील ऊतींवर गोठू लागतात. त्यामुळे त्याचे शरीर दगडाच्या रुपात स्टोर केले जाते आणि त्याच्याकडे पाहताना असे वाटते की शरीर दगडाचे झाले आहे. हा भाग भीषण उष्मा असून तलावही लाल झाल्याने तो अधिकच धोकादायक दिसतो.

First published:
top videos

    Tags: Shocking, Social media, Top trending, Viral