मराठी बातम्या /बातम्या /Viral /तिकीट काढावं लागेल म्हणून आई-वडिलांचं धक्कादायक कृत्य, विमानतळावर मुलाला सोडलं आणि...

तिकीट काढावं लागेल म्हणून आई-वडिलांचं धक्कादायक कृत्य, विमानतळावर मुलाला सोडलं आणि...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

विमानतळाव एक विचित्र घटना घडली आहे, तिकीट नाही म्हणून दाम्पत्याचं बाळासोबत धक्कादायक प्रकार.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 03 फेब्रुवारी : कोणतेही पालक आपल्या मुलांना जिवापाड जपतात. छोट्या मुलांचे पालक तर त्यांची फार काळजी घेतात आणि त्यांना अजिबात एकटं सोडत नाहीत. कारण, लहान असल्यामुळे त्यांना कशाचीही माहिती नसते आणि ती स्वत: आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत; मात्र काही पालक असेही असू शकतात, जे प्रसंगी बाळाला सोडूनही देऊ शकतात. एका विचित्र घटनेत एका दाम्पत्यानं आपल्या बाळाला इस्रायल विमानतळावरच सोडून दिल्याचं समोर आलं आहे.

  वृत्तानुसार, बाळासाठी वेगळं तिकीट खरेदी करण्यावरून वाद घातल्यानंतर या दाम्पत्याने आपल्या बाळाला इस्रायलमधल्या विमानतळावरच्या चेक-इन काउंटरवर सोडलं. ही घटना तेल अवीव बेन-गुरियन विमानतळावरच्या रायनायर एअर डेस्कवर घडली. हे पालक मुलाशिवाय फ्लाइटमध्ये चढले.

  हे ही पाहा : ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला सोडून आपापसात भांडू लागले डॉक्टर, Live Footage समोर

  रायनायर एअरनं सांगितलं की, या जोडप्यानं मुलाचं तिकीट खरेदी केलं नव्हतं. विमानतळ कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी डेस्कजवळ एका बेबी स्ट्रॉलरमध्ये आपल्या बाळाला सोडलं आणि पासपोर्ट चेकिंगसाठी ते पुढे गेले.

  सीएनएनला दिलेल्या निवेदनात एअरलाइननं म्हटलं आहे, की "तेल अवीव ते ब्रसेल्स (31 जानेवारी) या मार्गावर प्रवास करू इच्छिणाऱ्या या दाम्पत्याने त्यांच्या मुलाच्या बुकिंगशिवाय चेक-इन केलं. नंतर त्यांनी मुलाला चेक-इनवर काउंटरवर सोडलं आणि सिक्युरिटी चेकसाठी पुढे गेले. बेन गुरियन विमानतळावर एका एजंटने विमानतळ सुरक्षा यंत्रणेशी याबाबत संपर्क साधला. त्यांनी या प्रवाशांना परत बोलावलं आणि हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडे सोपवलं."

  इस्रायल विमानतळावरच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी 'आउटलेट' या स्थानिक माध्यमाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "बेल्जियन पासपोर्ट असलेलं जोडपं एका मुलासह टर्मिनल 1 वर आलं होतं. त्यांच्याकडे मुलाचं तिकीट नव्हतं. या जोडप्याला फ्लाइटसाठी उशीर झाला होता. जोडप्यानं बाळाची ट्रॉली बाळासह तिथेच सोडली आणि फ्लाइटसाठी बोर्डिंग गेटवर जाण्याच्या प्रयत्नात टर्मिनल 1च्या सिक्युरिटी चेककडे धाव घेतली."

  पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्रकरण शांत झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. ते म्हणाले, की मूल आई-वडिलांजवळ पोहोचलं आहे आणि या प्रकरणाचा पुढे काही तपास होणार नाही. दरम्यान, पालक आपल्या बाळाला अशा प्रकारे कसं सोडू शकतात, याचं आश्चर्य अनेकांना वाटत आहे.

  First published:

  Tags: Airplane, Shocking, Shocking news, Social media, Top trending, Viral