मुंबई : असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं मान्य असतं, परंतु लोक बऱ्याचदा असं काही करुन बसतात की त्याला उपमा देण्यासाठीही काही शिल्लक राहात नाही. असंच काहीसं प्रकरण उत्तराखंडमधून समोर आलं आहे, जेथे काही भलताच प्रकार पाहायला मिळाला.
येथे सोशल मीडियावर फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रीमंत कुटुंबातील मुलीला अडकवण्यासाठी एका तरुणाने त्याच्या फेसबुकवर मर्सिडीज कारसोबतचा फोटो टाकला. त्यामुळे ती तरुणी देखील त्याच्या जाळ्यात अडकली. परंतु या कहाणीने काही भलतच वळण घेतलं.
''मी बॉयफ्रेंडसोबतच रहाणार...'' लग्नानंतर नवऱ्यासमोर तरुणीचा ड्रामा
कारण या प्रकरणात या तरुणीने देखील काहीही विचार न करता त्या तरुणाशी लग्न केलं, पण जेव्हा तिला सत्य समजलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पण या कहाणीत ट्वीस्ट तेव्हा आला जेव्हा तरुणीचं सत्य उघड झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण रुरकीच्या गंगानहार कोतवाली भागातील रामपूर गावाशी संबंधित आहे. येथे राहणारा एक तरुण मजुरीचे काम करतो. श्रीमंत मुलीशी लग्न करण्याच्या इच्छेने त्याने एका तरुणीला फसवण्याचा प्लान आखला.
त्याने श्रीमंत घरातील मुलीसोबत लग्न करुन दिल्लीत संसार देखील थाटला. दोघेही तेथे प्रेमाने संसार करु लागले. पण एक वर्षानंतर जेव्हा ती तरुणी गावी तिच्या सासरी गेली तेव्हा तिच्यासमोर नवऱ्याचं खरं सत्य समोर आलं. तरुणीला हे समजलं होतं की तिचा नवरा पैसेवाला नसून एक मजूर आहे.
नवऱ्याने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण तरीही ती काही ऐकली नाही आणि थेट पोलिस्टेशनपर्यंत पोहोचली. तेथे पोलिसांशी बोलताना त्यांना हे जाणवलं की तरुणी अडखळत इंग्रजी बोलत आहे. तेव्हा तिच्या नवऱ्याने आपली फसवणूक करून लग्न केल्याचा आरोप तिने केला आहे. कारवाईची मागणी तिने केली, ज्यानंतर पोलीस संपूर्ण तपासात गुंतले.
पण त्यावेळी पोलिस तपासात जे घडल झालं ते पाहून नवर देवालाच धक्का बसला. पोलीस तपासात पोलिसांना तरुणीचा पासपोर्ट सापडला, जो पूर्णपणे भरला होता, यावरुन असे लक्षात आले की ही तरुणी अनेकवेळा सौदी अरेबियाला गेली होती. यानंतर पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या तरुणीचे दोनदा लग्न झाल्याचे निष्पन्न झाले.
तिने आता या तरुणाशी तिसरे लग्न केले आहे. पोलिसांच्या तपासात दोघांनी पैशाच्या लोभापायी एकमेकांची फसवणूक करून लग्न केल्याचे स्पष्ट झाले. आता तरूणाला कळाले की, त्याने नाही तर तरुणीनेच आपली फसवणूक केली होती. आता पोलिसांनी या दोघांवर आरोप लावले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Marriage, Shocking, Social media, Top trending, Viral