मुंबई 09 डिसेंबर : गेल्या काही वर्षांत वैद्यक क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. अनेक गंभीर आजारांवर आता खास तंत्रज्ञानाच्या मदतीनं उपचार केले जातात. सर्जरी अर्थात शस्त्रक्रियादेखील याला अपवाद नाही. कोणत्याही अवयवाची शस्त्रक्रिया करताना सर्जन वेगवेगळ्या प्रकारची प्रगत डिव्हाइस वापरतात. यामुळे योग्य रिझल्ट तर मिळतातच पण त्यासोबत रुग्णाला शस्त्रक्रियेचा कमी त्रास होतो. सध्या सोशल मीडियावर शस्त्रक्रियेसंदर्भातला एक फोटो व्हायरल होत आहे.
शस्त्रक्रिया सुरू असताना रुग्ण चक्क फिफा वर्ल्ड कप मॅच बघताना दिसत आहे. भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील या फोटोची दखल घेतली आहे. शस्त्रक्रिया सुरू असताना रुग्णाला टीव्हीवर फुटबॉल मॅच बघण्याचा आनंद घेता येणं, हेदेखील प्रगत तंत्रज्ञानाचं यश म्हणावं लागेल.
सध्या जगभरात फिफा वर्ल्ड कपची जोरदार हवा आहे. 90 मिनिटांची फुटबॉल मॅच कोणताही क्रीडा रसिक चुकवू इच्छित नाही. अनेक फुटबॉल फॅन्स तर मॅचचा लाइव्ह आनंद घेण्यासाठी कतारमध्ये दाखल झाले आहेत. काही फॅन्स मॅचचा आनंद घेण्यासाठी टीव्हीसमोर ठाण मांडत नसल्याचं चित्र आहे.
या फुटबॉल फीव्हरचा एक अनोखा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया सुरू असताना एक रुग्ण फुटबॉल मॅचचा आनंद घेताना त्यात दिसत आहे. या रुग्णाला असलेलं फुटबॉलचं वेड पाहून नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
हा व्हायरल फोटो पोलंडमधल्या किल्स शहरातल्या एका रुग्णालयात काढलेला आहे. SP ZOZ MSWiA या रुग्णालयाने हा फोटो शेअर केला आहे. पोलंडमधल्या किल्स इथल्या एका रुग्णावर उपचार करत असलेल्या रुग्णालयातून या संदर्भात माहिती मिळाली. 25 नोव्हेंबरला या रुग्णाच्या शरीराच्या खालच्या भागावर शस्त्रक्रिया करण्यात आली. वेल्स आणि इराण या टीमदरम्यान होणारी फुटबॉल मॅच शस्त्रक्रियेदरम्यान पाहू शकतो का, असा प्रश्न या रुग्णाने सर्जनला विचारला होता.
Hey @FIFAcom Don’t you think this gentleman deserves some kind of trophy…??? https://t.co/ub2wBzO5QL
— anand mahindra (@anandmahindra) December 8, 2022
रुग्णाची ही मागणी मान्य करण्यात आली. त्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये एक टीव्ही सेट बसवण्यात आला. या रुग्णाला ऑपरेशनपूर्वी स्पानयल अॅनेस्थेशिया देण्यात आला. शरीरातला कमरेपासून खालचा भाग बधिर करण्यासाठी या प्रकारचा अॅनेस्थेशिया अर्थात भूल दिली जाते.
त्यामुळे रुग्णाचा तो भाग बधिर झाला, तर रुग्ण जागृतावस्थेत असतो. म्हणूनच शस्त्रक्रिया सुरू असतानाही हा रुग्ण फुटबॉल मॅचचा आनंद घेऊ शकला. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या आश्चर्यकारक फोटोने भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांचंही लक्ष वेधून घेतलं. ही व्यक्ती एखाद्या ट्रॉफीसाठी पात्र आहे का असा प्रश्न त्यांनी फॉलोअर्सना विचारला आहे. महिंद्रा यांनी `नोट्स फ्रॉम पोलंड`च्या ट्विटर अकाउंटवरचं ट्विट शेअर केलं. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे, की 'पोलंडमधला एक रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये स्पायनल अॅनेस्थेशिया दिलेला असताना फुटबॉल वर्ल्डकपचा आनंद घेत आहे.
हा फोटो त्याच्यावर उपचार करणाऱ्या किल्स इथल्या SP ZOZ MSWiA या रुग्णालयाने शेअर केला आहे. सध्या या फोटोची जोरदार चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Top trending, Viral, Viral news, Viral photos