मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रात्रीच्या अंधारात गर्लफ्रेंडला भेटायला पोहोचला तरुण, पण सकाळी उठताच बसला 440 वोल्टचा झटका

रात्रीच्या अंधारात गर्लफ्रेंडला भेटायला पोहोचला तरुण, पण सकाळी उठताच बसला 440 वोल्टचा झटका

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आजच्या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे तुम्हाला कसं संकटात टाकू शकत्ं, हे तुम्हाला हे प्रकरण जाणून लक्षात येईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 25 सप्टेंबर : सोशल मीडियाचा क्रेज लोकांना असा काही लागला आहे की, आजकाल लोक आपल्या जोडीदार देखील येथे ऑनलाईन शोधू लागले आहेत. बरेचसे तरुण-तरुणी आता ऑलाईन डेटींग अॅपद्वारे एकमेकांना भेटू लागले आहेत. ऑनलाईन मैत्रीपर्यंत सगळं ठिक होतं. यामुळे समोरच्या व्यक्तीला ओळखायला वेळ तरी मिळायचा, परंतू स्वभाव आणि इतर गोष्टी न जाणून घेता थेट जोडीदार शोधणं म्हणजे थोडं न पटण्यासारखंच आहे आणि याचा काय परिणाम होईल हे आपण सांगू शकत नाही.

असाच काहीसा प्रकार एका तरुणासोबत घडला, ज्यामुळे त्याच्यावर पश्चातापाची वेळ आली.

ही संपूर्ण कहाणी ऐकल्यावर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आजच्या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे तुम्हाला कसं संकटात टाकू शकतx, हे तुम्हाला ही कहाणी ऐकून लक्षात येईल.

हे वाचा : एवढ्याशा चिमुकल्याने शिक्षिकेलाच दिली इतकी खतरनाक धमकी की...; VIDEO पाहून नेटिझन्सही घाबरले.

नक्की असं काय घडलं?

हे प्रकरण अमेरिकेतील लास वेगास येथील असल्याचे सांगितले जात आहे. एका डेटिंग अॅपवर या तरुणाची एका मुलीशी मैत्री झाली. काही दिवस चॅटींग केल्यानंतर या दोघांनी भेटण्याचं ठरवलं, तेव्हा दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी एका आलिशान हॉटेलमध्ये पोहोचले. येथे त्यांनी रात्रीचे जेवण केले आणि त्यानंतर ते हॉटेलच्या खोलीत गेले. इथे पर्यंत सगळं ठिक सुरु होतं, पण खरा खेळ घडला तो यानंतरच...

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा या तरुणाला जाग आली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रत्यक्षात ही तरुणी त्या तरुणाचे रोलेक्स घड्याळ आणि 3 लाखांहून अधिक रक्कम घेऊन गायब झाली होती. एवढेच नाही तर या घटनेनंतर या तरुणीचा फोनही बंद होता. यानंतर आता तरुणाच्या चांगलंच लक्षात आलं होतं की, त्याची फसवणूक झाली आहे.

हे वाचा : 5 वर्षापूर्वी हरवलेली व्यक्तीच्या नाकातली रिंग; अखेर शरीराच्या अशा भागात सापडली की डॉक्टरही शॉक

या सगळ्यानंतर तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली आणि एकून 20 लाख रुपये घेऊन ती तरुणी फरार झाली असल्याचं त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला आणि ती मुलगी त्यांना सापडली देखील. चोरीच्या गुन्ह्यात मुलगी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तपासादरम्यान या मुलीवर आणखी 8 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

First published:

Tags: Shocking, Social media, Top trending, Viral news