मराठी बातम्या /बातम्या /Viral /घराच्या छतावर निवडुंगाच्या दोन हजार रोपांची लागवड; पीलीभीतमधल्या व्यक्तीचा छंद

घराच्या छतावर निवडुंगाच्या दोन हजार रोपांची लागवड; पीलीभीतमधल्या व्यक्तीचा छंद

उत्तर प्रदेशातल्या पीलीभीतमधील हर्षल

उत्तर प्रदेशातल्या पीलीभीतमधील हर्षल

आपल्या घराच्या गच्चीवर तब्बल 400हून अधिक जातीच्या निवडुंगाच्या (कॅक्टस) सुमारे 2000हून अधिक रोपांची लागवड केली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

    पीलीभीत : कोणाला कसला छंद असेल सांगता येत नाही. कोणी शंख-शिंपले गोळा करतं, तर कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या काडेपेट्यांची कव्हर्स गोळा करतं. कोणाचा जीव शेतीत रमतो. तसंच अनेकांना शेतीची किंवा झाडा-झुडपांची लागवड करण्याची आवड असूनही शहरात राहत असल्यामुळे किंवा शेतजमीन नसल्यामुळे तो छंद जोपासता येत नाही. काही जण मात्र आपल्या छंदासाठी वाटेल ते करायला तयार असतात.

    उत्तर प्रदेशातल्या पीलीभीतमधल्या हर्षल यांचंच उदाहरण घ्या. त्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर तब्बल 400हून अधिक जातीच्या निवडुंगाच्या (कॅक्टस) सुमारे 2000हून अधिक रोपांची लागवड केली आहे. हिंदू धर्मात असं मानलं जातं, की काटेरी झाडं घरात ठेवू नयेत, ते अशुभ असतं; मात्र हर्षल यांचा त्यावर विश्वास नाही. ते म्हणतात, की निसर्गाने बनवलेली कोणतीच गोष्ट कोणासाठीही अशुभ होऊ शकत नाही. काही जण काही विशेष झाडं किंवा रोपांचं पूजनही करतात. मग निवडुंगाचं रोप अशुभ कसं असेल, असा सवाल ते विचारतात.

    हर्षल यांनी सांगितलं, की त्यांच्या या छंदाची सुरुवात त्यांच्या वडिलांना असलेल्या छंदामुळे झाली. त्यांच्या वडिलांनाही कॅक्टस कलेक्शनचा छंद होता. त्यामुळे हर्षल वाढले तेच कॅक्टसच्या सान्निध्यात. त्यांनी आपल्या वडिलांचा छंद पुढे नेला आणि देश-विदेशातल्या कॅक्टसच्या दुर्मीळ प्रजातींची लागवड करून आपलं पॉलिगार्डन सजवायला सुरुवात केली. हर्षल यांनी सांगितलं, की त्यांच्या गार्डनमध्ये 40 वर्षं जुनं असलेलं वेरल कॅक्टस आहे, तसंच 35 वर्षं जुनं असलेलं एरियो कार्पसही आहे.

    न्यूज 18 लोकलशी बोलताना हर्षल यांनी सांगितलं, की या कॅक्टसचं मूळ भारतात नाही. या कॅक्टसपैकी अनेक प्रजाती उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात. त्यामुळे त्या रोपांना खतं आणि पाणी देतानाही अमेरिकेतल्या वातावरणाचा विचार केला जातो. हर्षल यांनी कॅक्टसच्या या 450 प्रजातींसाठी एक वेगळं टाइम टेबल तयार केलं आहे. ते टाइम टेबल ते काटेकोरपणे पाळतात. त्यामुळे त्यांचा हा छंद दिवसेंदिवस बहरत चालला आहे.

    First published:

    Tags: Social media, Top trending, Viral, Viral news