मुंबई 29 जानेवारी : असे अनेक लोक आहेत, ज्यांना प्राणी फार आवडतात. यामध्ये बहुतांश लोक कुत्रा प्रेमी असतात. म्हणेजच काय तर कुत्रा पाळणारे लोक सर्वाधिक असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. अलीकडेच Netflix ने जाहीर केले आहे की ते जगातील सर्वात श्रीमंत कुत्र्यावर एक सिनेमा येणार आहे. या एका बातमीने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.
हा श्रीमंत कुत्रा कोणाचा आहे आणि तो इतका श्रीमंत कसा झाला असा अनेकांना प्रश्न पडला आहे. खरंतर हा जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा जर्मनीचा आहे जो जर्मन शेफर्ड जातीचा आहे.
हे ही पाहा : 'कितने तेजस्वी लोग है' भारतीयांचा जुगाड पाहून तुम्ही हेच म्हणाल, पाहा टॉप 9 फोटो
या कुत्र्याची एकूण संपत्ती 4100 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मेस्सी, रोनाल्डो, अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरुख खानसह जगातील अनेक बड्या सेलिब्रिटींकडेही एवढी संपत्ती नाही, जेवढी या कुत्र्याकडे आहे.
सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या व्हायरल झालेल्या या जर्मनीच्या अब्जाधीश कुत्र्याची बातमी पूर्णपणे फेक न्यूज असल्याचे समोर आले. जी फक्त एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. एका कुत्र्यावर डॉक्युमेंट्री फिल्म बनवली जात आहे, ज्यामुळे ही मार्केटिंग करण्यात आली.
पण आम्ही तुम्हाला अशाच काही कुत्र्यांबद्दल सांगणार आहोत जे प्रत्यक्षात करोडपती आहेत. हे कुत्रे परदेशातील नसून भारतातील आहे, ज्यांच्या नावावर करोडोंची संपत्ती आहे. गुजरातमधील बनासकांठा येथील पालनपूर तालुक्यात दिसणारे कुत्रे इतके श्रीमंत आहेत की, ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
हे कुत्रे 1-2 नाही तर 5 कोटी रुपयांचे मालक आहेत, जाणून घेऊया कसं?
अनेक वर्षांपूर्वी जेव्हा राजेशाही होती तेव्हा येथे नवाबांची सत्ता असायची, मात्र एकेकाळी गावातील नवाबाने गावकऱ्यांना जमीन दिली होती आणि गावकऱ्यांनी ती जमिन कुत्र्यांना दिली होती. सध्या येथील कुत्र्यांकडे 20 बिघे जमीन आहे. आजच्या काळात या जमिनींची किंमत 5 कोटींहून अधिक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Shocking news, Social media, Top trending, Viral