मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवऱ्यासाठी गर्लफ्रेंड शोधायला बायको करतेय मदत, यामागील कारण जाणून बसेल धक्का

नवऱ्यासाठी गर्लफ्रेंड शोधायला बायको करतेय मदत, यामागील कारण जाणून बसेल धक्का

सोर्स : सोशल मीडिया

सोर्स : सोशल मीडिया

ट्रॅव्हर्सने या मागचे कारण उघड केलं आहे. जे ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 31 जानेवारी : बायको आपल्या नवऱ्यावर बहुतांश संशय घेत असते. यामागे तिचा एकच विचार असतो की, त्याने कोणत्याही महिलेकडे पाहू नये किंवा जाण्याचा विचार करु नये. पण एक असं प्रकरण समोर आलं आहे. जे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.

खरंतर ऑस्ट्रेलियातील एक करोडपती उद्योगपती आपल्या पत्नीसह नवीन गर्लफ्रेंडच्या शोधात आहे. म्हणजेच त्याच्या बायकोला देखील याचं काहीच वाटत नाही. आता असं ऐकून डोक्याला नक्कीच आट्या पडल्या असणार. पण हे खरं आहे.

हे ही पाहा : नवऱ्यावर संशय म्हणून पाठलाग करत बायको पोहोचली मसाज पार्लर, पुढे जे घडलं ते...

बिझनेसमॅन ट्रॅव्हर्स बेयॉन डझनभर मैत्रिणींसोबत पार्टी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ट्रॅव्हर्स बेयॉन आणि त्याची बायको अनेकदा महिलांसोबतचे पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. लोक अनेकदा हा प्रश्न विचारतात की त्याच्या बायकोला अशा कृत्यांचा राग येत नाही का?

त्यावर आता ट्रॅव्हर्सने या मागचे कारण उघड केलं आहे.

ट्रॅव्हर्स म्हणतात की जर तुम्हाला आनंदी जीवन हवे असेल तर एक चांगली पत्नी शोधा. ट्रॅव्हर्स, यांनी पत्नी तैशा बियॉन्सेसोबत एक फोटो देखील पोस्ट केला. यामध्ये तिने बिकिनी घातली आहे. तैशा त्याची दुसरी पत्नी आहे. ट्रॅव्हर्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात आणि जीवन जगण्याबद्दल ते तुमच्याबद्दल काय म्हणतात याचा विचार करू नका. तुमच्या स्वतःच्या अटींवर जीवन जगा.

माझ्या गर्लफ्रेंड या माझ्या पत्नीच्याही गर्लफ्रेंड आहेत. ट्रॅव्हर्सच्या या पोस्टवर अनेकांनी पाठिंबा दिला असला तरी काहींनी याला कडाडून विरोध केला. विशेष म्हणजे ट्रॅव्हर्स आणि तैशा यांना चार मुले आहेत.

ट्रॅव्हर्सची एकूण संपत्ती १४० दशलक्ष पौंड आहे. त्याची तंबाखू कंपनी आहे, जिथून तो भरपूर कमाई करतो. ही कंपनी त्याच्या पालकांनी उभी केली होती. 1990 मध्ये तो या कंपनीचा CEO झाला. ट्रॅव्हर्सलाही फुटबॉलची आवड होती. पण दुखापतीमुळे त्याने खेळ सोडला.

त्याने अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंगही केलं आहे. तैशाने तिच्या इंस्टाग्रामवर एक लिंक शेअर केली आहे. यामध्ये तिने महिलांना ट्रॅव्हर्सची गर्लफ्रेंड बनण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. याशिवाय या महिलांमध्ये गर्लफ्रेंड होण्यासाठी कोणते गुण असावेत, हेही नमूद केलं आहे.

First published:

Tags: Girlfriend, Social media, Social media trends, Top trending, Viral, Viral news