मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ऑनलाई फ्लाईट तिकीट बुक करताच, तरुणासमोर आली अशी गोष्ट, पाहून तुम्हाला ही बसेल धक्का

ऑनलाई फ्लाईट तिकीट बुक करताच, तरुणासमोर आली अशी गोष्ट, पाहून तुम्हाला ही बसेल धक्का

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आदित्य व्यंकटेश नावाच्या प्रवाशाला हैदराबाद ते बेंगळुरू असा प्रवास करायचा असल्यानं त्याने फ्लाइटचं तिकीट बुक केलं, पण त्याच्यासोबत भलताच प्रकार घडला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई २५ नोव्हेंबर : रेल्वेचं ऑनलाइन रिझर्व्हेशन करताना अनेकदा दिवसाच्या गाडीचं तिकीट काढताना चुकून रात्रीच्या गाडीचं तिकीट बुक झाल्याने फजिती झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. एएम आणि पीएम या वेळेच्या गोंधळात भलतंच तिकीट बुक होऊन जातं. असा अनुभव अनेकांनी घेतला असेल. दरम्यान, विमानाच्या तिकिटाचं बुकिंग करताना एका प्रवाशाला वेगळाच अनुभव आला.

त्याला जायचं होत एकीकडं अन् तिकिटावर ठिकाण मात्र भलतंच दाखवलं गेलं. हा सगळा प्रकार पाहून तोही चक्रावून गेला व सोशल मीडियावर ही बाब शेअर करत सर्वांना सांगितली.

आदित्य व्यंकटेश नावाच्या प्रवाशाला हैदराबाद ते बेंगळुरू असा प्रवास करायचा असल्यानं त्याने फ्लाइटचं तिकीट बुक केलं. त्यानी एअर एशियाचं फ्लाइट निवडलं व पुढील प्रक्रिया निश्चित करण्याचा त्यानं प्रयत्न केला. पण ही प्रक्रिया पाहताच तो चक्रावून गेला. कारण पोहचण्याच्या ठिकाणी काही वेगळं आणि निघण्याच्या ठिकाणी भलतंच ठिकाण लिहिलं होतं.

व्यंकटेशला हे कळतच नव्हतं की काय चुकत आहे. कन्फर्मेशन पॉपअपमध्ये बेंगळुरू ते बेंगळुरू असं तिकीट बुक होत होतं. तर दुसरीकडे, कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरू ते कोलकात्यातील नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचं तिकीट बुक होत असल्याचं दाखवल जात होतं.

तिकीट बुक करतानाच झाली चूक

तिकीट बुक करताना उडालेला सर्व गोंधळ व्यंकटेशने नंतर सोशल मीडियावर शेअर केला. त्यानी संबंधित एअरलाइन्सलाही टॅग केलं. नेटिझन्सनी या पोस्टवर अनेक मजेशीर कमेंट दिल्या. लोकांनी एअरलाइन्सबद्दलचे त्यांचे विचार शेअर केले. काही जणांनी बुकिंगच्या वेळी होणाऱ्या चुकांसाठी एअरलाइन्सना जबाबदार धरलं,तर काही जणांनी बुकिंग अॅपमुळे हा गोंधळ उडाल्याचं म्हटलं आहे.

आदित्य व्यंकटेशने त्याच्या ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिलं की, ‘@AirAsiaIndia’ वास्तविक पाहता सगळं काही गोंधळात टाकणारं आहे. मी तिकीट बुक करत असेन तर वास्तावात मला जायचं कुठे आहे आणि मी निघू कुठून हेच कळत नाहीये.

तांत्रिक बिघाडामुळे घडला प्रकार

तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचं उत्तर एअरलाइन्सनी दिलं. पेज एकदा रिफ्रेश करून नवीन बुकिंग करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला यावेळी देण्यात आला. परंतु, प्रवाशाने पुन्हा उत्तर देताना म्हटलं की, तात्पुरत्या बिघाडामुळे हा प्रकार घडला असावा. तिकीट पुन्हा एकदा बुक करण्याचा प्रयत्न केला, पण ते होऊ शकलं नाही.

क्रोम ब्राऊझरमधून फ्लाइट बुकिंग करताना ही अडचण निर्माण होत आहे. परंतु मी तिकीट बुक केलं आहे.’ दरम्यान, शेअर करण्यात आलेल्या या ट्विटला 11,000 हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर अनेकजणांनी याला रिट्विट केलं आहे. या पोस्टवर अनेक नेटिझन्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

First published:

Tags: Shocking news, Top trending, Viral