नवी दिल्ली 19 डिसेंबर : जगभरात कोरोनाने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. या विषाणूमुळे लोकांच्या आयुष्यात अनेक प्रकारचे बदल झाल्याचं पाहायला मिळतं. या बदलांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि फेस मास्कचाही समावेश आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेची (Third Wave of Corona) शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान फ्लोरिडामधून एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका व्यक्ती फ्लाईटमधून खाली उतरवण्यात आलं आहे.
लायसन्स मागितले म्हणून कारचालकाने वाहतूक पोलिसाला नेले 1 किमी फरफटत,VIDEO
मियामी फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एडम जेनेला यूनायडेट एअरलाइन्सच्या फाईल्टने वॉशिंग्टन डीसी येथे जायचं होतं. मात्र, या व्यक्तीने फ्लाइटमध्येच असं काही केलं की विमानतळावरच त्याला विमानातून खाली उतरवण्यात आलं. Insider न्यूजच्या वृत्तानुसार, 38 वर्षाच्या या व्यक्तीने फ्लाइटमध्ये मास्कच्या जागी आपल्या प्रेयसीचे काल रंगाचे अंतर्वस्त्र चेहऱ्यावर लावले (Man Applied Underwear as Face Mask).
LEAVE IT TO THE #FLORIDAMAN! This guy from Cape Coral tried wearing a #thong as a #mask on a United flight in Fort Lauderdale today. He was kicked off the plane. TSA and sheriff were called but passengers remained peaceful. #airtravel #Florida #aviation #travel pic.twitter.com/kUnkXrgTY8
— Channing Frampton (@Channing_TV) December 16, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने लाल रंगाचे अंतर्वस्त्र मास्कप्रमाणे आपल्या तोंडावर बांधले. यानंतर आरामात तो आपल्या जागेवर जाऊन बसला. मात्र एअरहोस्टेस आणि केबिन क्रूच्या ही बाब लक्षात आली. काही वेळातच क्रू मेंबर्सनी त्याच्याजवळ येत, त्याला मास्क बदलण्यास सांगितलं. तसंच त्याला सांगितलं की अंडरवियर मास्कप्रमाणे घालणं म्हणजे नियमांचं उल्लंघन आहे. मात्र हा व्यक्ती वाद घालू लागला. याच दरम्यान कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून ट्विटरवर शेअर केला.
जेने याने शेवटपर्यंत आपल्या चेहऱ्यावरील अंतर्वस्त्र हटवण्यास नकार दिला. नंतर पोलिसांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. या संपूर्ण घटनेदरम्यान हा व्यक्ती शांततेत बसून सर्वांचं बोलणं ऐकत राहिला. अखेर जेने आपल्या सीटवरुन उठला आणि कोणासोबतच काहीही न बोलता विमानातून खाली उतरला. त्याचं असं म्हणणं होतं, की या अंडरविअरनेही माझं तोंड झाकलं गेलं आहे. अशात त्याने कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर एअरलाइन्सने जेनेला एक मेल केला. यात लिहिण्यात आलं होतं, की या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्याला या फ्लाइटने बॅन केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Domestic flight, Shocking news