नवी दिल्ली, 1 मार्च : समुद्र किनारी (Sea Beach) फिरणं, मजा-मस्ती करणं अनेकांना आवडतं. पण अनेकदा या मस्तीमध्ये अनेक लोक अशा काही चुका करतात, की काही क्षणाची मस्ती आयुष्यभरासाठी भारी पडू शकते. काहीसा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. ज्यात काही लोक समुद्रकिनारी मजा-मस्ती करताना दिसत आहेत. यात काही लोक एक छोटं विमान समुद्रकिनारी (Small Aircraft) उतरवतात आणि पुढे जे काही होतं, त्याने सर्वच जण हैराण होतात.
हा व्हिडीओ नाजी अल तखीम नावाच्या एका ट्विटर युजरने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी, 'न्यूझिलंडच्या मार्टिन्स बे समुद्र किनाऱ्यावर एका दिवसांत दोन वेळा विमान क्रॅश झालं. हा व्हिडीओ स्थानिक न्यूज चॅनल ऑन डिमांड न्यूजचा आहे.' असं त्यांनी लिहिलंय. व्हिडीओमध्ये काही लोक समुद्र किनारी पाण्यात मस्ती करताना दिसत आहेत.
एक छोटं विमान समुद्राच्या किनाऱ्याहून उड्डाण करतं. विमानाचं उड्डाण होण्याच्या काही सेकंदातच विमानाचं संतुलन बिघडतं आणि विमान समुद्रात जाऊ लागतं. विमान वेगाने फिरतं आणि समुद्रात पलटी मारतं.
त्यानंतर पायलट आणि को-पायलट विमानात आलेली खराबी ठिक करतात आणि पुन्हा त्या विमानाच्या उड्डाणाचा प्रयत्न करतात. परंतु दुसऱ्या वेळीही विमान आधीप्रमाणेच असंतुलित होवून पाण्यात जावून पलटतं.
Plane crashes twice in one day at Martins Bay beach in New Zealand #on_Demand_News pic.twitter.com/PmHF3K4aAg
— ناجي الطخيم (@Naji_alt) February 26, 2021
महत्त्वाची बाब म्हणजे या अपघातात कोणलाही ईजा झालेली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral