मराठी बातम्या /बातम्या /Viral /मेट्रोतील मंजुलिका पाहून प्रवाशांच्या मनात भरली धडकी, Video पाहून नेटकरी थक्क

मेट्रोतील मंजुलिका पाहून प्रवाशांच्या मनात भरली धडकी, Video पाहून नेटकरी थक्क

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे लोक एका रात्रीच प्रसिद्धी झोतात येतात. रील्स आणि यूट्यूबच्या जगात अगदी काही सेकंदाच्या क्लीपवर कोणीही स्टार बनत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 26 जानेवारी : सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे लोक एका रात्रीच प्रसिद्धी झोतात येतात. रील्स आणि यूट्यूबच्या जगात अगदी काही सेकंदाच्या क्लीपवर कोणीही स्टार बनत आहे. काहीजण प्रसिद्ध होण्यासाठी काहीही मजेशीर, हटके, विचित्र, धक्कादायक गोष्टी करताना दिसून येतात. त्यांचे फोटो व्हिडीओदेखील इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसून येतात. अशातच या व्हिडीओंमध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली असून या व्हायरल व्हिडीओमुळे अनेकजण घाबरून गेले आहेत.

सोशल मीडियावर सध्या लक्ष वेधत असलेला व्हिडीओ मेट्रोमधील आहे. मेट्रोमध्ये एक मुलगी मंजुलिकाचा अवतार घेऊन आली असल्याचं पहायला मिळत आहे. तिनं हुबेहुब मंजुलिका सारखा मेकअप केला असून कपडेही सेम परिधान केले आहेत. तिला पाहून तुम्हालाही चित्रपटातील मंजुलिकाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. मेट्रेमध्ये तिचा असा अवतार पाहून अनेकजण घाबरले आहेत. तीदेखील मेट्रेमध्ये बसलेल्या लोकांना घाबरवताना दिसत आहे. एक माणूस तर तिला पाहून पळूनच जातो.

View this post on Instagram

A post shared by news18lokmat (@news18lokmat)

मेट्रोमधील या मंजुलिकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत. सोशल मीडियावर नेटकरी या व्हायरल मंजुलिकाला पाहून मजा देखील घेत आहेत. काहीजण तिचा अवतार पाहून भीती वाटत असल्याचंही सांगत आहेत. या व्हिडीओने सध्या इंटनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अशा व्हिडीओंची काही कमी नाही. असे अनेक प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालत असतात. नेटकरीही अशा व्हिडीओंना भरपूर पसंती देतात. मात्र कधी कधी विचित्र व्हिडीओ बनवणं अनेकांच्या अंगलट देखील येतात.

First published:

Tags: Social media viral, Top trending, Videos viral, Viral