मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रेस जिंकल्याच्या उत्साहात सायकलिस्टकडून घडलं भयंकर कृत्य; थेट रुग्णालयात पोहोचली बायको

रेस जिंकल्याच्या उत्साहात सायकलिस्टकडून घडलं भयंकर कृत्य; थेट रुग्णालयात पोहोचली बायको

 उत्साह, आनंद, जोशाच्या भरात या सायकलिस्टकडून सायकल रेसिंग स्पर्धेतच मोठी दुर्घटना घडली

उत्साह, आनंद, जोशाच्या भरात या सायकलिस्टकडून सायकल रेसिंग स्पर्धेतच मोठी दुर्घटना घडली

उत्साह, आनंद, जोशाच्या भरात या सायकलिस्टकडून सायकल रेसिंग स्पर्धेतच मोठी दुर्घटना घडली

    वॉशिंग्टन, 07 जून : आपण एखादा गेम, स्पर्धा जिंकल्याचा आनंद कुणाला होणार नाही. हा आनंद व्यक्त करण्याची पद्धतही प्रत्येकाची वेगवेगळी असते. असाच एक सायकलिस्ट आपण सायकल रेस जिंकल्याचा आनंद व्यक्त करत होता. उत्साहात जोशाजोशात त्याच्याकडून असं काही कृत्य घडलं की ते त्याच्या बायकोला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढावली. उत्साह, आनंद, जोशाच्या भरात या सायलिस्टकडून सायकल रेसिंग स्पर्धेतच मोठी दुर्घटना घडली (Cyclist Accident Video). सायकलिस्ट लुइस कार्लोस सियाने (Luis Carlos Chia) नुकतीच एक सायकल रेस जिंकली. कोलंबियामध्ये एनुअल साइक्लिंग रेस द वुल्टा ही सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यात लुइस सहभागी झाला आणि त्याने प्रथम क्रमांक पटकावला. जिंकण्याचा उत्साह इतका होता की जोशात त्याच्याकडून असं कृत्य घडलं की त्याची बायको थेट रुग्णालयात पोहोचली. व्हिडीओत पाहू शकता लुइस जसा विनिंग लाइन पार करतो तेव्हा आपले दोन्ही हात छातीवर मारत आपला आनंद व्यक्त करतो. काही अंतरावरच त्याची पत्नीही आनंदाने त्याचे फोटो क्लिक करत असते. आपला पती जिंकल्याचा क्षण ती आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असते. लुइस इतका आनंदात होता की त्याला आपल्यासमोर उभी असलेली पत्नीही दिसली नाही. त्याने थेट तिला धडक दिली आणि पुढे निघून गेला. लुइसची पत्नी फिनिशिंग लाइनवर फोटोग्राफर्सच्या गर्दीत उभी होती. हे वाचा - पक्षी कसा उडतो पाहण्यासाठी पक्ष्यासोबतच आकाशात उडाली व्यक्ती; पुढे काय घडलं पाहा VIDEO सायकलचा वेग इतका होता की तिची टक्कर बसतात लुइसची पत्नी रस्त्यावर कोसळली. व्हिडीओत पाहू शकता जशी लुइसची पत्नी कोसळली तसं तिच्या मदतीसाठी एक व्यक्ती धावत आली. ती व्यक्ती तिला उठवण्याचा प्रयत्न करत होती. पण ती काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. ती बेशुद्ध झाली होती. सुरुवातीला ही महिला कोण हे कुणालाचा माहिती नव्हतं. नंतर सर्वांना ती लुइसची पत्नी क्लाउडिया रोनाकेंसियो असल्याचं समजलं. सायकल धडकचाच लुइसचंही सायकवरील नियंत्रण सुटलं आणि तो पुढे जाऊन सायकलसह खाली कोसळला. त्याच्या पायाला दुखापत झाली तो लंगडत चालतानाही या व्हिडीओत दिसतो. हे वाचा - जगासमोर Girlfriend ला करत होता प्रपोज, मध्येच असं झालं की; उद्धवस्त झाला प्लान, Video पाहिल्यानंतर तुम्हाला ही येईल राग लुईसने कोलंबियातील एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की, मी ब्रेक मारण्याचा प्रयत्न करत होतो पण अचानक ब्रेक लागला नाही. मी माझ्याच पत्नीला धडक दिली. पण तिच्या जागी दुसरी कोणतीही व्यक्ती असू शकली असती. रेस संपली आहे आणि मी तिच्या दिशेने येत आहे, हे तिने पाहिलं होतं. पण ती रस्त्यातून बाजूला का झाली नाही, हे मला समजलं नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या