Home /News /viral /

Viral Video : ‘या’ तिरंदाजाची जिद्द पाहून तुम्ही म्हणाल अशक्य काहीच नसतं!

Viral Video : ‘या’ तिरंदाजाची जिद्द पाहून तुम्ही म्हणाल अशक्य काहीच नसतं!

आयएफएस सुशांता नंदा (Sushanta Nanda IFS) यांनी 23 सेकंदांचा एक व्हिडीओ (VIDEO) ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक तिरंदाज (Archer) हातांच्या शिवाय अर्जुनासारखी तिरंदाजी करत आहे.

    मुंबई, 9 जानेवारी:  ‘जगात अशक्य काहीच नसतं’ या आशयाचं महान फ्रेंच राजा नेपोलियन बोनापार्टचं (Napoleon Bonaparte) एक विधान आहे. फार कमी लोकं नेपोलियनच्या विधानाला साजेसं जगतात. आयुष्यातील एखाद्या घटनेचं खापर परिस्थितीवर, इतर व्यक्तींवर अथवा बाह्य घटकांवर फोडण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो, त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता त्यावर जिद्दीनं मात करणारी मोजकी मंडळी त्यांच्यातील वेगळेपणामुळे सर्वांच्या आदरस्थानी असतात. आयएफएस सुशांता नंदा (Sushanta Nanda IFS) यांनी 23 सेकंदांचा एक व्हिडीओ (VIDEO) ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक तिरंदाज (Archer) हातांच्या शिवाय अर्जुनासारखी तिरंदाजी करत आहे. हा 23 सेकंदांचा व्हिडीओ आपल्याला खूप काही शिकवणारा आहे. सारं काही गमावलं तरी हार न मानता खूप काही करता येतं याची प्रेरणा या व्हिडीओतून आपल्याला मिळते. दोन्ही हात नसलेला तिरंदाज हात आणि खांद्याच्या मदतीनं लक्ष्यभेद करतो. तिरंदाजीच्या स्पर्धेत इतक सर्व स्पर्धकांना मागं टाकत त्यानं गोल्ड मेडल देखील मिळवले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. या व्हिडीओला 10 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि एक हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण या तिरंदाजाच्या जिद्दीला सलाम करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या