Mask वरुन पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या व्यक्तीने म्हटलं, "मला मास्क घालायचा होता पण..."

Mask वरुन पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या व्यक्तीने म्हटलं,

हे दाम्पत्य कारमध्ये मास्क न लावताच जात होते. पोलिसांनी त्यांना थांबवून मास्क न लावण्याचं कारण विचारलं असता त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 एप्रिल: दिल्लीत कोरोना रुग्णांच्या (Corona patients) संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कालपासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ८ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दिल्लीत मास्क (Mask) न लावल्यास आणि कोरोनाच्या इतर नियमांचं पालन न केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. असाच पोलीस कारवाईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारमध्ये बसलेल्या एका दाम्पत्याने मास्क लावले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबवलं. पोलिसांनी रोखल्यामुळे चिडलेल्या या दाम्पत्याने पोलिसांना धमक्या दिल्या आणि हुज्जत घातली. हा प्रकार रविवारी दिल्लीच्या दरियागंज भागात घडला. पंकज असं या व्यक्तीचं नाव आहे.

हे दाम्पत्य कारमध्ये मास्क न लावताच जात होते. पोलिसांनी त्यांना थांबवून मास्क न लावण्याचं कारण विचारलं असता त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओत महिला म्हणते की “मी यूपीएससी परीक्षा पास केली आहे.” तर पोलीस म्हणाले की तुम्ही जबाबदारीने मास्क घालायला पाहिजे. त्यावर महिला म्हणते की “माझ्या कारमध्ये मी मास्क का घालू?” जर “मी आता माझ्या पतीला किस केलं तर तुम्ही मला थांबवाल का?” असा उर्मटपणाचा प्रश्नही या महिलेनी पोलिसांना विचारल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. नंतर या जोडप्याने गाडी बाजूला घेतल्यावर ती महिला गाडीतून उतरून पुरुष पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जातानाही व्हिडीओत दिसत आहे. तिथे सर्व पुरूष पोलीस असल्यामुळे सर्वांनी संयमाने आणि आदर राखत महिलेशी संवाद साधल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे.

विना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO

आता, इंडिया टुडेच्या पत्रकाराने घेतलेल्या पंकजच्या मुलाखतीनुसार, या संपूर्ण घटनेसाठी पंकजने आपल्या पत्नीला जबाबदार धरलं आहे. तो म्हणाला की पोलिसांनी थांबवल्यानंतर ती चिडली आणि स्वतःची चूक असल्याचं मान्य केलं. जेव्हा पत्रकाराने पंकजला विचारले की तू मास्क का घातला नाहीस? यावर पंकज म्हणतो की “मला मास्क घालायचा होता, पण माझी पत्नी मला घालू देत नव्हती. पोलिसांनी थांबवण्यापूर्वी मास्क घालण्यावरून आमच्या दोघांत वाद झाला, तसंच पोलिसांना पत्नीने अपशब्द वापरले,” असं पंकजनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणानंतर या दाम्पत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दिल्लीत रविवारी रात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन (Delhi Lockdown) लावण्यात आला आहे. या आठ दिवसांत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद राहणार आहे. या आठवड्यात शहरातील रुग्णालयांमध्ये बेड्सची संख्या आणि ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषधांची सुविधा वाढवणार असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

First published: April 21, 2021, 8:21 AM IST

ताज्या बातम्या