• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • कुत्र्याच्या मृत्यूनंतर अंत्ययात्रा काढून श्रद्धांजली; मालक म्हणाला...

कुत्र्याच्या मृत्यूनंतर अंत्ययात्रा काढून श्रद्धांजली; मालक म्हणाला...

नरेश साह यांचा पाळीव कुत्रा टोनीचा मंगळवारी मृत्यू झाला. कुत्र्याच्या मृत्यूनंतर या पशूप्रेमीनं हिंदू रीतीरिवाजानुसार त्याला अंतिम निरोप दिला. टोनीची अंत्ययात्राही काढण्यात आली. त्याच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.

 • Share this:
  समस्तीपूर (बिहार), 19 मे: सध्याच्या काळात कुटुंबीयांनाही कोरोनामुळं (Corona in India) मृत्यू झालेल्या घरच्या व्यक्तींचे अंत्यदर्शन घ्यायला मिळत नाही. एरवीही अनेक जण अंत्यविधी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी वेळेअभावी उपस्थित राहू शकत नाहीत किंवा तशा सबबी देतात. मात्र, बिहारमधील या घटनेवरून आपल्या समाजात अजूनही मानवता जिवंत असल्याचं दिसून आलं आहे. बिहारच्या समस्तीपूर (Samastipur bihar) जिल्ह्यात प्राणी प्रेमाची अनोखी कहाणी समोर आली आहे. मालकाने कुत्र्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले आहेत. जिल्ह्यातील शेरपूर ढेपुरा पंचायत क्षेत्रातील शेरपूर दियारा येथे राहणाऱ्या नरेश साह यांचा पाळीव कुत्रा टोनीचा मंगळवारी मृत्यू झाला. कुत्र्याच्या मृत्यूनंतर या पशूप्रेमीनं हिंदू रीतीरिवाजानुसार त्याला अंतिम निरोप दिला. टोनीची अंत्ययात्राही काढण्यात आली. त्याच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. हे वाचा - SBI मधील क्लार्क पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली; 5 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी होणार भरती व्यवसायानं डॉक्टर असलेल्या नरेशकुमार यांनी सांगितले की, त्यांनी सोनपूर येथील जत्रेत सुमारे 12 वर्षांपूर्वी टोनीला खरेदी केलं होतं. तेव्हापासून टोनी कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांच्याबरोबर होता. आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा लळा लागला होता. टोनीला त्याच्या मृत्यूनंतर अशाप्रकारे अंतिम निरोप द्यावा, जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना प्राण्यांना कशी वागणूक द्यावी याबाबत प्रेरणा मिळावी, अशी नरेश यांची इच्छा होती. टोनी जीवनातला महत्त्वाचा भाग होता नरेश यांनी सांगितलं की, टोनी त्यांच्यासाठी फक्त एक कुत्रा नव्हता; तर, तो त्यांच्या परिवारातला महत्त्वाचा सदस्य होता. त्याला घरी आणल्यापासून त्यानं नेहमी घर आणि इतर मालमत्तेचं प्रामाणिकपणे रक्षण केलं. त्यानं आमची मनापासून सेवा केली, असे नरेश सांगतात. तो घरी आल्यापासून आमच्या घरात नेहमी बरकत येत राहिली. आमची प्रगती झाली असंही ते म्हणाले. अशा या टोनीला मृत्यूनंतर कायम आठवणीत राहील अशा पद्धतीने अंतिम निरोप दिला. ग्रामस्थांनीही त्याच्या मृतदेहाला फुलं अर्पण करून त्याला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर गंगेच्या किनारी त्याचा मृतदेह पुरण्यात आला.
  Published by:News18 Desk
  First published: