Home /News /viral /

फक्त एक SMS आणि धावत परत आला चोर; चोरलेल्या सामानासोबत स्वतःकडीलही पैसे काढून दिले

फक्त एक SMS आणि धावत परत आला चोर; चोरलेल्या सामानासोबत स्वतःकडीलही पैसे काढून दिले

title=

फक्त एक मेसेज वाचून चोराला फुटला घाम. चोरी केलेलं सामान स्वतः जाऊन मालकाला परत दिलं.

    लंडन, 29 जुलै : चोरीची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. चोराला पकडणं म्हणजे सोपं नसतं. काही वेळा तर चोराच्या फोटोचे पोस्टर सर्वत्र लावून  किंवा टीव्हीवर त्यांचा फोटो दाखवून या चोराला शोधून देणाऱ्याला बक्षीस अशी जाहीरात दिली जाते. तरी चोर सहजासहजी सापडत नाही. हुशार चोर पोलिसांच्या तावडीत लवकर येत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका एसएमएसमुळे चोर इतका घाबरला की जिथं त्याने चोरी केली तिथं तो स्वतःच परत आला. त्याने चोरी केलेलं सामानही मालकाला परत केलं. इतकंच नव्हे तर तो जादा पैसेही त्या मालकाला देऊन गेला. यूकेतील चोरीचं हे अजब प्रकरण चर्चेत आलं आहे. चोराचं नाव सरकोजी असल्याचं सांगितलं जातं आहे.सरकोजीला एका घराबाहेर एक पार्सल दिसलं. त्यात 1500 रुपये किमतीचा पंखा होता. हे पार्सल चोरी करून तो फरार झाला होता. पण त्याचं हे कृत्य दरवाजासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं. जेव्हा सामानाचं मालक घरी पोहोचला तेव्हा त्याने सीसीटीव्ही पाहिलं आणि चोराची ओळख पटवण्यासाठी म्हणून ते सोशल मीडियावरही शेअर केलं. त्यावेळी मालकाच्या एका नातेवाईकाने त्या चोराला ओळखलं. हे वाचा - बुलेटमध्ये पेट्रोल कमी म्हणून वाहतूक पोलिसांनी कापलं चलन; बायकर Shocked! मालकाच्या नातेवाईकाने सरकोजीला मेसेज केला. जेव्हा त्याने तो मेसेज वाचला तेव्हा त्याला धक्का बसला. त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं, 'तू तोच उंदीर आहेस ना, जो लोकांचे पार्सल चोरत आहे. हो ना. दहा मिनिटांत तुझा नाव, पत्ता काढेन.जितके पार्सल चोरले आहेत, तितकी तुझी बोटं कापेन. लवकरच भेटू' सामान मालकाला परत केलं नाही तर बोटं कापणार हा मेसेज वाचून सरकोजी खूप घाबरला.  त्याने या मेसेजला रिप्लायही दिला. 'मी माफी मागतो. चोरी केलेल्या पार्सलसोबत आणखी 4800 रुपयेही देईन', असं त्याने सांगितलं. यानंतर सरकोजीने ज्या व्यक्तीचा पंखा चोरला त्याला तो परत केला आणि सोबत आणखी पैसेही दिले. हे वाचा - Yuck! 'डोळे-कान-नाकातील घाण काढतो आणि...', BF च्या विचित्र सवयीला वैतागली GF; सोशल मीडियावर मागितली मदत त्यानंतर सरकोजीला पोलिसांनी अटक केली. पार्सल आपणच चोरी केल्याची कबुलीही सरकोजीने पोलिसात दिली.  26 जुलैला सरकोजीला ब्रिस्टल क्राऊन कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला दोन वर्षे पाच महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान रिपोर्टनुसार सरकोजीने जो पंखा परत केला होता आणि पैसे दिले होते, ते एका संस्थेला दान करण्यात आले.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crime, Viral, World news

    पुढील बातम्या