Home /News /viral /

प्रेग्नंट होताच समोर आलं पार्टनरचं 20 वर्षांपूर्वीचं गुपित; महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली

प्रेग्नंट होताच समोर आलं पार्टनरचं 20 वर्षांपूर्वीचं गुपित; महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

प्रेग्नंट महिलेसमोर तिच्या पार्टनरचं एक सत्य अचानक समोर आलं आणि...

    लंडन, 25 जानेवारी : बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीला ओळखण्यात चूक करतो किंवा पूर्णपणे ओळखत नसतो आणि अचानक त्या व्यक्तीबाबत असं काही सत्य समोर येत, जो सर्वात मोठा धक्का असतो. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एक महिला प्रेग्नंट झाल्यानंतर तिला तिच्या पार्टनरचं 20 वर्षांपूर्वीचं सत्य समजलं (Pregnant woman know partners 20 year old truth). त्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ब्रिटनमधील एका कपलची ही स्टोरी आहे. एका व्यक्तीने आपल्या रिलेशनशिपमधील हा अनुभव स्वतःच मांडला आहे. एरिक असं या व्यक्तीचं नाव. ज्याने आपली होणाऱ्या बायकोपासून असं काही लपवलं होतं, जे अचानक तिच्यासमोर आलं आणि त्यामुळे तो अडचणीत सापडला. एरिकने सांगितलं, तो आपल्या होणाऱ्या बायकोसोबत राहत होता. तो नेहमी कामानिमित्त बाहेर जायचा. याचवेळी त्याची होणारी बायको प्रेग्नंट झाली. तो एकदा कामाच्या निमित्ताने दोन दिवसांसाठी बाहेर गेला. जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याच्या होणाऱ्या बायकोने त्याची बॅग उचलायला गेली. एरिकने तिला कसंबसं ते करण्यापासून रोखलं आणि बोलण्यात गुंतवलं. त्यानंतर एक दिवस एरिक फोनवर बोलत होता, तितक्यात त्याची होणारी बायको आली आणि त्याने फोन कट केला. हे वाचा - आश्चर्य! 9 महिने नव्हे तर 2000 वर्षे आईच्या पोटात होतं बाळ; बाहेर काढताच... एरिकच्या होणाऱ्या बायकोला त्याचं वागणं थोडं विचित्र वाटलं. त्यानंतर तिची नजर पुन्हा एरिकच्या बॅगवर पडली जी त्याने उचलू दिली नव्हती. त्याच्या नकळत तिने ती बॅग उघडून पाहिली. बॅगेत तिला काही फोटो मिळाले. त्यात एरिकसोबत एक महिला होती. तिने त्या महिलेची माहिती मिळवली आणि तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी तिच्याकडून जे एरिकबाबत सत्य समजलं ते ऐकून तिला धक्काच बसला. ती महिला दुसरी तिसरी कोणी नव्हे तर एरिकची पत्नी होती. 20 वर्षांपूर्वी दोघांनीही लग्न केलं होतं, त्यांना एक मुलगीही होती. दोघी एकमेकींसमोर असताना एरिकही तिथं पोहोचला. आपली बायको आणि होणारी बायको यांना एकत्र पाहून तोसुद्धा शॉक झाला. आता तो चांगलाच अडचणीत सापडला आहे. हे वाचा - तरुणांनाही लाजवेल असा आजीआजोबांचा VIDEO; या वयस्कर कपलला पाहून नेटिझन्स हैराण झी न्यूजने द सनच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटिश डे-टाईम टीव्ही शो दिस मॉर्निंगच्या फोन इन सेक्शनमध्ये एरिकने आपला हा अनुभव मांडला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Relationship, Viral

    पुढील बातम्या