Home /News /viral /

Shocking! भीषण अपघातानंतर उठून नाचू लागली व्यक्ती; VIDEO पाहून चक्रावून जाल

Shocking! भीषण अपघातानंतर उठून नाचू लागली व्यक्ती; VIDEO पाहून चक्रावून जाल

एका कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात पाहून मात्र तुम्हीही चक्रावून जाल.

    नवी दिल्ली, 26 जून : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral videos) होत असतात. रोज काही ना काही व्हायरल होत असतं. कधी कोण कुठे व्हायरल होईल याचा काही नेम नाही. दिवसभरात अनेक व्हिडीओ, निरनिराळे व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral on social media) फिरत असतात. अशातच असाच काहीसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गराळा घालत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. व्हायरल होत असलेला व्हिडीओ अपघाताचा (Accident video)आहे. हा अपघात पाहून मात्र तुम्हीही चक्रावून जाल. एका कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गाडीचे तुकडे झालेले पहायला मिळत आहे. दोन्ही गाड्यांची धडक एवढी वेगानं झाली की, दुचाकीस्वार जोरात रत्स्याच्या मधोमध पडला. हे वाचा - बापरे! तरुणाने चक्क सिंहालाच केल्या गुदगुदल्या; काय परिणाम झाला तुम्हीच पाहा VIDEO अशा प्रकारच्या भीषण अपघातानंतर एखाद्याला जागेवरुन उठणंही कठिण होतं. मात्र हा तरुण उठून डान्स करु लागला. त्याचं हे अजब कृत्य बघून तुम्हालाही वाटेल हा काय करतोय?.  मात्र त्या तरुणाला बसलेली धडक अतिशय जोरदार असून त्याच्या डोक्यावर त्याचा परिणाम झाल्याचं दिसतंय. त्यानं केलेल्या या कृतीनं लोकं बुचकळ्यात तर पडलेच मात्र काहीशे घाबरलेही. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि 15 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओ रिट्विट केला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला असून व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर शेअरही केलं जात आहे. अशा प्रकारचे विविध व्हिडीओ तुम्हाला रोज सोशल मीडियावर पहायला मिळतील.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Viral, Viral news, Viral video.

    पुढील बातम्या