मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मैत्रिणीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत; तरुणीने लग्नादिवशीच केला धक्कादायक खुलासा

मैत्रिणीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत; तरुणीने लग्नादिवशीच केला धक्कादायक खुलासा

नवरीबाईच्या मैत्रिणीनं लग्नाच्या आधीच नवरदेवाला पटवलं (Bride ditched by friends) . हैराण करणारी बाब म्हणजे या नवरीला आजही याबद्दल माहिती नाही

नवरीबाईच्या मैत्रिणीनं लग्नाच्या आधीच नवरदेवाला पटवलं (Bride ditched by friends) . हैराण करणारी बाब म्हणजे या नवरीला आजही याबद्दल माहिती नाही

नवरीबाईच्या मैत्रिणीनं लग्नाच्या आधीच नवरदेवाला पटवलं (Bride ditched by friends) . हैराण करणारी बाब म्हणजे या नवरीला आजही याबद्दल माहिती नाही

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 14 डिसेंबर : सध्या लग्नाचा सीझनच (Wedding Season 2021) सुरू आहे. या काळात लग्नसमारंभातील अनेक मजेशीर आणि धक्कादायक घटना ऐकायला मिळतात. सध्या एका नवरीसोबत घडलेली एक अजब घटनाही चर्चेचा विषय ठरत आहे. या नवरीबाईच्या मैत्रिणीनं लग्नाच्या आधीच नवरदेवाला पटवलं (Bride Ditched by Friends) . हैराण करणारी बाब म्हणजे या नवरीला आजही याबद्दल माहिती नाही की तिच्या नुकत्याच झालेल्या पतीचं तिच्या मैत्रिणीसोबतच अफेअर आहे (Affair of Bridesmaid with Groom).

हेही वाचा - शेवटच्या घटका मोजत होतं माकड; व्यक्तीने तोंडाने श्वास देत घडवला चमत्कार, VIDEO

ऑनलाईन शेअरिंग साईट रेडिटवर नुकतंच एका मुलीने एका लग्नाची अजब कथा सांगितली आहे. या तरुणीने सांगितलं की हे लग्न म्हणजे पूर्णपणे विश्वासघात होता. कारण नवरीच्या मैत्रिणीनेच तिच्यासोबत अतिशय वाईट कृत्य केलं होतं. या मैत्रिणीनं तिनं लग्न सुरू असतानाच नवरदेवाचे असे कारनामे उघड केले, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.

या पोस्टनुसार, महिला आपल्यासोबत काम करणाऱ्या दोन तरुणींसह मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती. हे लग्न दोन वर्षाआधीच ठरलं होतं. मात्र तारीख टळत ते 2021 पर्य़ंत पोहोचलं. तोपर्यंत या सगळ्या मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणी काम करू लागल्या होत्या. मात्र तरीही नवरीने सर्वांना आमंत्रित केलं. यानंतर या मैत्रिणीही लग्नात पोहोचल्या मात्र पुढे भलतंच घडलं. दारूच्या नशेत असलेल्या नवरीच्या मैत्रिणीनं लग्नाच्या दिवशीच नवरदेवाचं सत्य आपल्या इतर दोन मैत्रिणींसमोर मांडलं.

हेही वाचा - लसीकरण पथकाला पाहून पळाली महिला; जबरदस्तीने दिली लस, ढसाढसा रडतानाचा VIDEO

नशेत तिन्ही मैत्रिणी जेव्हा एकजागी बसल्या होत्या तेव्हा त्यातील एकीने नवरदेव आणि आपल्या अफेअरबद्दल सांगितलं. तिनं हेदेखील सांगितलं की वेडिंग रिहर्सल पार्टीच्या दरम्यान नवरदेव तिच्या रूममध्ये आला होता. तसंच अनेक महिन्यांपासून ते दोघं मेसेजवर एकमेकांसोबत बोलत आहेत. इतकंच नाही तर तिने आपल्या मैत्रिणींना नवरदेवासोबत केलेली पर्सनल चॅटींगही दाखवली. ही पोस्ट वाचल्यावर अनेकांनी या तरुणीला सल्ला दिला की तिने हे सर्व नवविवाहित मैत्रिणीला सांगायला हवं.

First published:

Tags: Relationship, Wedding couple