VIDEO : आईची बॉलिंग आणि मुलाची बॅटिंग, तुमच्या आयुष्यातही आला असेल असा क्षण!

VIDEO : आईची बॉलिंग आणि मुलाची बॅटिंग, तुमच्या आयुष्यातही आला असेल असा क्षण!

डोळ्यात पाणी आणणारा हा VIDEO पाहून तुमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जानेवारी : भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. त्यामुळं लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांमध्ये क्रिकेटची क्रेझ असते. त्यामुळं गल्लो-गल्ली क्रिकेट हा खेळ खेळला जातो. क्रिकेट म्हंटलं की प्रत्येक मुलाचे स्वप्न असते भारतीय संघात स्थान मिळावे आणि देशाचे प्रतिनिधित्व करावे. मात्र सर्वांच्या नशीबी देशाचे प्रतिनिधित्व नसले तरी हा खेळ प्रत्येकाला काही तरी शिकवून जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या मुलाला बॉलिंग करताना दिसत आहे तर मुलगा बॅटिंग करत आहे.

वाचा-VIDEO : तानाजी चित्रपट सुरू असताना थिएटरमध्येच तुफान हाणामारी

या व्हिडीओला सुंदर असे कॅप्शन कैफनं दिले आहे. 27 सेकंदाच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. या व्हिडीओ पाहून क्रिकेटचे महत्त्वही कळत आहे.

वाचा-बॉलिवूडमधील सर्वात HOT गाण्यावर विद्यार्थ्यांसमोरच थिरकली अभिनेत्री, पाहा VIDEO

वाचा-LIVE सामन्यात अम्पायरला ‘याडं लागलं’, पाहा हा भन्नाट VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: January 13, 2020, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading