Home /News /viral /

सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BabyPenguin, आदित्य ठाकरेंचा काय संबंध?

सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BabyPenguin, आदित्य ठाकरेंचा काय संबंध?

सोशल मीडियावर आदित्य ठाकरेंवरून #BabyPenguin का होतय ट्रेंड?

    मुंबई, 16 जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना 'बेबी पेंग्विन' म्हटल्याबद्दल आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात अवमानकारक पोस्ट लिहल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी समित ठक्कर नावाच्या युवकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे सध्या सोशल मीडियावर #BabyPenguin असा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय आरोपी नागपूर इथला रहिवासी असून समित ठक्कर असं त्याचं नाव आहे. त्याने 01 जून, 30 जून आणि 01 जुलै रोजी ठाकरे आणि राऊतांबद्दल आक्षेपार्ह भाष्य केलं होतं. अशाच एका ट्विटमध्ये समित ठक्कर याने उद्धव ठाकरे यांना औरंगजेब आणि आदित्य ठाकरे यांना 'बेबी पेंग्विन' म्हटलं होतं. समित ठक्कर याच्यावर व्ही पी रोड पोलिसांनी सोमवारी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत बदनामीकारक लेख लिहिणं आणि अश्लील लेख प्रसारित करणं, रेखाचित्र काढणं आणि अपमान केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरवर समित ठक्कर याचे सध्या 42,700 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. वासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी ही पोस्ट पाहिली आणि 1 जुलै रोजी व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात ठक्करविरोधात तक्रार दाखल केली. पुण्यावरचं मोठं संकट पोलिसांमुळे टळलं, लॉकडाऊनमध्येही या राज्यात जाऊन उधळला कट समित ठक्करने ट्विट केलेल्या व्हिडिओवर लिहिलं होतं की, 'बेबी पेंग्विन आणि दिशा पटानीला पहिल्यांदाच व्यगात्मक पद्धतीने सादर करत आहे. आनंद घ्या. " यावर मिश्रा म्हणाले होते की, "एखाद्यावर टीका करण्यासाठी आपला लोकशाहीचा हक्क वापरताना काही मर्यादा आल्या पाहिजेत. अश्लील भाषा वापरून आपण कोणालाही सार्वजनिकपणे बदनाम करू शकत नाही. ठक्कर यांना मी आदरणीय राजकीय व्यक्तिमत्त्वाबद्दल अशा अपमानकारक पोस्ट करणं थांबवण्यास सांगितलं होतं. परंतु त्यांनी तसं केलं नाही आणि पुढेही तेच करत राहिले. त्यामुळे मी त्याच्याविरुध्द तक्रार दाखल केली. " अंधपणावर मात करत बारावीत मिळवलं घवघवीत यश, वाचा फोटोमागच्या जिद्दीची कहाणी सोशल मीडियावर सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे #BabyPenguin असा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या