Home /News /viral /

चालकाने प्रयत्न करूनही कार थांबलीच नाही अन् रस्त्यावर दिसलं भयंकर दृश्य, विचित्र अपघाताचा VIDEO

चालकाने प्रयत्न करूनही कार थांबलीच नाही अन् रस्त्यावर दिसलं भयंकर दृश्य, विचित्र अपघाताचा VIDEO

गाडी वेगाने येते आणि पुढे सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांना धडकते आणि मग थांबते. मात्र कारच्या धडकेने समोर उभा असलेला स्कूटी चालक खाली पडतो

  नवी दिल्ली 16 मे : ट्रॅफिक सिग्नल हे असं ठिकाण आहे जिथे चौक असल्यामुळे अनेक अपघात होतात. कधी चालकाचा निष्काळजीपणा तर कधी वाहनातील बिघाड हे अपघाताचं प्रमुख कारण ठरतं. एका भीषण रस्ते अपघाताचा असाच एक व्हिडिओ (Accident Video Viral) काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक वेगवान गाडी स्कूटी आणि दुसऱ्या एका वाहनाला धडकताना दिसते. सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. महिलेनं धावत्या ट्रेनमधून आधी मुलांना फेकलं, मग स्वतःही घेतली उडी अन्..., VIDEO पाहून उडेल थरकाप फेसबुक, इंस्टाग्रामसह इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला भीषण रस्ता अपघाताचा व्हिडिओ २१ एप्रिलचा आहे. व्हिडिओमध्ये एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार ट्रॅफिक सिग्नलकडे वेगाने जाताना दिसत आहे. गाडी चालकाच्या नियंत्रणात राहात नाही. वाहनचालक प्रयत्न करत असूनही गाडी थांबत नाही.
  गाडी वेगाने येते आणि पुढे सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांना धडकते आणि मग थांबते. मात्र कारच्या धडकेने समोर उभा असलेला स्कूटी चालक खाली पडतो. गाडीचा चालक आणि आजूबाजूच्या वाहनातील लोक त्या स्कूटीस्वाराला बघण्यासाठी आपल्या गाडीमधून खाली उतरतात. OMG! तरुणीने पाण्यात केला इतका जबरदस्त Stunt; पुन्हा पुन्हा पाहाल हा VIDEO सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड झाल्यापासून भरपूर जणांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ vroom_auto_feeds नावाच्या सोशल मीडिया यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत 2.5 कोटीहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, 1 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Road accident, Shocking video viral

  पुढील बातम्या