मराठी बातम्या /बातम्या /Viral /बाईक स्टंटच्या नादात तिघांची झाली भयंकर अवस्था; अपघाताचा Live Video

बाईक स्टंटच्या नादात तिघांची झाली भयंकर अवस्था; अपघाताचा Live Video

तीन मुलं बाईकवर बसून स्टंट करत आहेत पण अचानक त्यांच्याकडून एक चूक झाली आणि ते धाडकन एका भिंतीला जाऊन आदळले. या घटनेनंतर आता स्टंट करताना ते दहावेळा विचार करतील.

तीन मुलं बाईकवर बसून स्टंट करत आहेत पण अचानक त्यांच्याकडून एक चूक झाली आणि ते धाडकन एका भिंतीला जाऊन आदळले. या घटनेनंतर आता स्टंट करताना ते दहावेळा विचार करतील.

तीन मुलं बाईकवर बसून स्टंट करत आहेत पण अचानक त्यांच्याकडून एक चूक झाली आणि ते धाडकन एका भिंतीला जाऊन आदळले. या घटनेनंतर आता स्टंट करताना ते दहावेळा विचार करतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 02 मार्च : आजच्या काळात सोशल मीडिया हे लोकांसाठी एक असा प्लॅटफॉर्म बनलं आहे, जे कोणालाही जमिनीवरून उचलून सिंहासनापर्यंत पोहोचवू शकतं. परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वेळा लोक आपल्या जीवाशी खेळतात आणि त्यांचं हे पाऊल कधीकधी त्यांना चांगलंच महागात पडतं. अनेकजण लवकर प्रसिद्धी मिळवण्यासाठी जीवघेणे स्टंट करतात. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. ज्यामध्ये तीन मुलं एकाच बाईकवर बसून स्टंट करताना दिसत आहेत, पण शेवटी त्यांच्या एका चुकीमुळे पुढे नको ते घडतं.

टाकीवर एक अन् पाठीमागे दुसरी; मुंबईतील युवकाचा 2 तरुणींसह धावत्या दुचाकीवर विचित्र प्रकार, VIDEO

कोणताही स्टंट करण्यापूर्वी अनेक वेळा सराव करणं आवश्यक आहे. मग कुठेतरी ते परफेक्शन येतं, ज्यामुळे आपण लोकांना इम्प्रेस करू शकतो. पण लोक घाईत असतात आणि नको ते करून बसतात. आता हा व्हिडिओच बघा ज्यात तीन मुलं बाईकवर बसून स्टंट करत आहेत पण अचानक त्यांच्याकडून एक चूक झाली आणि ते धाडकन एका भिंतीला जाऊन आदळले. या घटनेनंतर आता स्टंट करताना ते दहावेळा विचार करतील.

View this post on Instagram

A post shared by 97 | #.. (@mkalimani_og)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन मुलांचा एक ग्रुप रस्त्यावर स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ते रस्त्याच्या मधोमध आपली बाईक फिरवू लागतात. रस्त्यावर समोरून चालणाऱ्यांनाही यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र हे तरुण आपला स्टंट मात्र थांबवत नाहीत. मात्र याचदरम्यान त्यांच्या दुचाकीचा तोल बिघडल्याने त्यांची दुचाकी भिंतीला धडकली आणि तिघेही खाली पडले.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर mkalimani_og नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. ही बातमी लिहिपर्यंत ३८ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून आपापल्या प्रतिक्रिया कमेंट करून दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'लोकांना आपला जीव धोक्यात घालायचा छंदा का आहे.' तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, 'बाईकवर आणखी स्टाइल दाखवा..' आणखी एका यूजरने लिहिलं की, 'ज्याप्रकारे मुलगा पडला ते पाहून वाटतं की नक्कीच त्याला दुखापत झाली असेल.

First published:
top videos

    Tags: Shocking video viral, Stunt video