मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Idea ची ही 12 वर्षे जुनी जाहिरात कोरोनाकाळात झाली खरी; VIDEO पाहून तुम्हालाही पटेल

Idea ची ही 12 वर्षे जुनी जाहिरात कोरोनाकाळात झाली खरी; VIDEO पाहून तुम्हालाही पटेल

अभिषेकची 12 वर्षे जुन्या जाहिरातीत तुम्हाला आजचं चित्र दिसेल.

अभिषेकची 12 वर्षे जुन्या जाहिरातीत तुम्हाला आजचं चित्र दिसेल.

अभिषेकची 12 वर्षे जुन्या जाहिरातीत तुम्हाला आजचं चित्र दिसेल.

  • Published by:  Meenal Gangurde

अनेकदा आपण एखादं काम करतो तेव्हा त्याच्या परिणामांचा फार विचार करीत नाही. मात्र पुढे जाऊन त्याचे परिणाम अनपेक्षितरित्या समोर आले तर...? असाच काहीसा प्रकार टेलिकॉम कंपनी आयडिया (सद्यस्थितीत वोडाफोन आयडिया) च्या 2008 मधील या जाहिरातीत आहे. आयडियाची ही जाहिरात ( Idea Advertising) पाहून याची तुलना सध्याच्या परिस्थितीशी करू शकता आणि कोरोना महासाथीमध्ये मोबाइलमुळे आपणं कसे जोडले गेलो आहोत याची जाणीव होते.

मग ही बाब ऑनलाइन क्लासेसची असो वा वर्क फ्रॉम होमची. इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. सध्याच्या काळात आपण घरात बसून व्हिडीओ किंवा ऑडिओच्या माध्यमातून संपर्क साधू शकतो. असंच काहीसं आयडियाच्या या जाहिरातीत पाहायला मिळतं. या जाहिरातीत बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan ) मुख्य भूमिकेत आहे. जो एका शाळेचा मुख्याध्यापक आहे. त्याच्या शाळेत एक गरीब व्यक्ती आपल्या मुलीचं एडमिशन करण्यासाठी येतो. मात्र जागा फूल झाल्यामुळे मुलीला दाखल करता येऊ शकत नाही. हे पाहून अभिषेक बच्चनला वाईट वाटतं. त्यानंतर तो मुलांना शाळा मिळावी, यासाठी आयडिया शोधू लागतो. त्यावेळी फोनवर क्लास चालविण्याची कल्पना त्याचा सुचते व मोबाइलच्या माध्यमातून तो ग्रामीण भागातील मुलांना शिक्षकांशी जोडतो.

हे ही वाचा-जिराफला पानं खाऊ घालत होता मुलगा, अचानक हवेतच उडाला; पाहा Shocking Video

" isDesktop="true" id="557809" >

सध्याच्या परिस्थितीत कसं आहे साधर्म्य?

आताबद्दल सांगायचं झालं तर कोरोना महासाथीमुळे अधिकतर लोक घरातून काम करीत आहेत. सरकारी आणि खासगी सर्व शाळांतील शिक्षक ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून मुलांना शिक्षित करीत आहे. टेक्नॉलॉजीने सर्वांना एकमेकांशी जोडलं आहे आणि ते सहज प्रशिक्षण मिळवत आहेत.

सध्या व्हि़डीओ कॉलिंग, व्हिडीओ मीटिंग अॅप्स आणि ऑ़डिओ कॉलिंगच्या माध्यमातून मुलांना आणि शिक्षकांना कनेक्ट केलं जात आहे. याशिवाय मोबाइलने सर्वसामान्यांनाही जोडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये व्होडाफोन इंडियाने आयडिला सेल्युलरसोबत एकत्र येत वोडाफोन आयडिया लिमिटेड नावाची नवीन एन्टिटी सुरू केली होती. 2020 मध्ये वोडाफोन आयडिलाला रिब्रांड करीत Vi बनवलं आहे.

First published:

Tags: Abhishek Bachchan, Corona, Social media viral