मुक्या जीवाचा आधार बनला अभिजित! भटक्या कुत्र्यांसाठी जुन्या TVचं केलं घर

मुक्या जीवाचा आधार बनला अभिजित! भटक्या कुत्र्यांसाठी जुन्या TVचं केलं घर

अभिजितने टीव्हीच्या सहाय्यानं या निराधारांना आधार दिला आहे. त्यांच्यासाठी एक छोटं घर तयार केलं आणि श्वानाच्या पिल्लांना त्यामध्ये ठेवलं.

  • Share this:

मुंबई, 28 डिसेंबर : थंडीच्या दिवसांमध्ये जशी आपल्याला उब हवी असते तसंच प्राण्यांनाही थंडी वाजत असते. अशा वेळी हे प्राणी उष्णता शोधत फिरत असतात. तर कधी अंगाचं मुटकुळं करून कुडकुडणाऱ्या थंडीत झोपी जातात. त्यांची ही अवस्था एका व्यक्तीला पाहावली नाही आणि त्यानं श्वानासाठी खास घर करण्याचा निर्णय घेतला.

अभिजित दोवराह यांनी श्वानांना या थंडीच्या दिवसात कुडकुडायला लागू नये म्हणून युक्ती काढली आणि त्यातून त्यांच्यासाठी खास घर तयार करण्याची संकल्पना सुचली. आसाम इथे शिवसागर परिसरात भटक्या कुत्र्यांसाठी त्यांनी टीव्हीचा वापर केला आहे. बंद असलेला किंवा खराब झालेले टीव्ही घेऊन त्यापासून श्वानांसाठी त्यांनी घर तयार केलं आहे. अभिजित यांनी तयार केलेल्या घराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हे वाचा-'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट वादात, गंगूबाईच्या कुटुंबियांची न्यायालयात धाव

अभिजितने टीव्हीच्या सहाय्यानं या निराधारांना आधार दिला आहे. त्यांच्यासाठी एक छोटं घर तयार केलं आणि श्वानाच्या पिल्लांना त्यामध्ये ठेवलं. अभिजित यांच्या या कामाचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे.

अभिजीतला कुत्रे खूप आवडतात. जेव्हा त्याच्या भावाने त्याला कुत्रा गिफ्ट केला तेव्हा हे प्रेम त्याच्यावर घडले. ते रात्रंदिवस भटक्या कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी बाहेर पडतात. भटक्या कुत्र्यांना पर्याय नसल्याचे त्याने सांगितले. ते परिस्थितीशी बरेच संघर्ष करतात. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून अभिजित यांनी त्यांच्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 28, 2020, 9:44 AM IST
Tags:

ताज्या बातम्या