अरे हा येडा की खुळा? या कारणामुळे यूट्यूबरने जाळली 1.10 कोटींची मर्सिडीज; पाहा VIDEO

अरे हा येडा की खुळा? या कारणामुळे यूट्यूबरने जाळली 1.10 कोटींची मर्सिडीज; पाहा VIDEO

सोशल मीडिया (Social Media)वर हिट होण्यासाठी आजकाल लोकं काहीही करायला तयार असतात. एका यूट्यूबर(Youtuber)ने चक्क 1.10 कोटींची मर्सिडीज जाळली आहे.

  • Share this:

मुंबई 28 ऑक्टोबर: सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामुळे एखाद्याला एका रात्रीत प्रसिद्ध मिळते. सोशल मीडियावर हिट होण्यासाठी लोकं काहीही करायला तयार असतात. आपला एखादा व्हिडीओ (Video) किंवा एखादी पोस्ट व्हायरल करण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातात. याचच एक  उदाहरण म्हणजे यूट्यूबर (Youtuber) मिखाइल लिटविन. या पठ्ठ्याने यूट्यूबवर व्हिडीओ बनवण्यासाठी चक्क 1.10 कोटींची मर्सिडीज (Mercedes) कार जाळली.

मिखाइल लिटविन रशियाला राहतो. मिखाइलची ही करामत समजताच त्याच्या लोकप्रियतेमध्ये मात्र प्रचंड वाढ झाली. यूट्यूबवर त्याचे 5-10 नाही तर 50 लाख सब्सक्रायबर्स आहेत. इन्ट्राग्राम(Instagram) वर त्याला 1.16 करोड लोकं फॉलो करतात. त्याच्याकडे जीटी 63एस या मॉडेलची मर्सिडीज होती. या कारला त्याने स्वत:नेच आग लावली.  त्याच्या या व्हिडीओला अनेक दिवसागणिक हजारोंच्या घरात व्ह्यूज येत आहेत. लोकं मिखाइलच्या व्हिडीओवर एक एक अतरंगी कॉमेट्सही करत आहेत.

या यूट्यूबरने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये एका मोकळ्या मैदानात तो कार चालवत येत आहे. असं दाखवण्यात आलं आहे. काळ्या रंगाची ही मर्सिडीज अतिशय जबरदस्त दिसत आहे. मोकळ्या मैदानात कार आणल्यानंतर तो गाडी थांबवतो. गाडीच्या डिक्कीमधून कार जाळण्यासाठी इंधन काढतो. आणि कारला आग लावतो. असं दाखवण्यात आलं आहे. काही वेळाने कार जळून खाक होते. हा व्हिडीओला यूट्यूबवर 1.14 व्ह्यूज आहेत आणि 10 लाखांपेक्षा जास्त लाइक्स आले आहेत.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 28, 2020, 3:29 PM IST

ताज्या बातम्या