मराठी बातम्या /बातम्या /Viral /भेटा या 100 वर्षांच्या तरुण आज्जीबाईंना! पिझ्झा खात जगतात भन्नाट आयुष्य

भेटा या 100 वर्षांच्या तरुण आज्जीबाईंना! पिझ्झा खात जगतात भन्नाट आयुष्य

वय हा केवळ एक आकडा असतो असं म्हटलं जातं. अनेक माणसं हे वाक्य खरोखर जगत असतात.

वय हा केवळ एक आकडा असतो असं म्हटलं जातं. अनेक माणसं हे वाक्य खरोखर जगत असतात.

वय हा केवळ एक आकडा असतो असं म्हटलं जातं. अनेक माणसं हे वाक्य खरोखर जगत असतात.

मुंबई, 7 जानेवारी : अनेकदा सोशल मीडियावर (social media) अशा कहाण्या व्हायरल होतात, ज्या आपल्याला सहजपणे आयुष्याचा अर्थ सांगून जातात. आता अशीच एक कहाणी व्हायरल झाली, ती म्हणजे 100 वर्षांच्या आजीची (100 years old granny). लहानमोठ्या सगळ्यांना प्रेरक अशी ही भन्नाट कहाणी आहे.

'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'पेजवरची (Humans of Bombay Page) ही कहाणी अनेकांनी थेट मनाला भिडल्यानं उचलून धरली आहे. 100 वर्षांच्या आजीची ही कहाणी जगण्याचा फॉर्म्युला सांगून जाते. या महिलेला तिची नातवंडं-पंतवंडं आजी म्हणतात, पण या आजींची जीवनवृत्ती (lifestyle) कमालीची तरुण (young) आहे.

आजींचा जन्म झाला 1920 साली. त्या महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यासह स्वातंत्र्याच्या आंदोलनातही (Freedom Struggle) सहभागी झाल्या होत्या. त्यांनी हिटलरचा काळही अगदी जवळून पाहिला. लोकांना त्या काळच्या सत्यकथा आजी आजही अगदी जिवंतपणे, रंगवून सांगतात. आपल्या अनुभवांचं मोल जाणत त्या आयुष्य भरभरून जगल्यात.

आजी मानतात, की आपल्याला हरेक क्षण मनापासून जगता  सोबतच आपण बदलत्या काळानुसार बदललो पाहिजे. त्यांनी स्वतःला बदललं, ते नव्या पिढीकडं पाहून. खाण्यापिण्याच्या सवयीही त्यांनी नव्या काळानुसार वाकवल्या-वळवल्या. अगदी पिझ्झासारखं (pizza) जंक फुडसुद्धा त्या कुटुंबियांसोबत बसून मजेत खातात. आजी सांगतात, 'माझ्या पिढीच्या महिला मला मी जरा जास्तच मॉडर्न असल्याचं बोलून दाखवतात. त्या हेसुद्धा म्हणतात, की मी माझ्या मुलांना बिघडवते आहे. पण काळासोबत बदलण्याचा फॉर्म्युला मला महत्त्वाचा वाटतो. पतीनं मला कधी डिनरसाठी बाहेर नेलं नाही. पण मी त्यांच्याकडे त्यासाठी हट्ट करायचे.

आजीच्या मुलाला आंतरधर्मीय विवाह करायचा होता. त्यावेळी आजीशिवाय इतर सगळे मुलाच्या विरोधात होते. मात्र आजीच्या खंबीर पाठिंब्यामुळेच त्याचा विवाह होऊ शकला.

First published:

Tags: Lifestyle, Mahatma gandhi, Pizza