मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सिंह आहे का पाळलेली मांजर? Video पाहून डोळ्यावर बसणार नाही विश्वास

सिंह आहे का पाळलेली मांजर? Video पाहून डोळ्यावर बसणार नाही विश्वास

जंगलाच्या राजाला कुणी पाळीव प्राण्यासारखं वागवलं तर... तुमचा पहिल्यांदा विश्वास बसणार नाही, पण हे प्रत्यक्षात घडलं आहे.

जंगलाच्या राजाला कुणी पाळीव प्राण्यासारखं वागवलं तर... तुमचा पहिल्यांदा विश्वास बसणार नाही, पण हे प्रत्यक्षात घडलं आहे.

जंगलाच्या राजाला कुणी पाळीव प्राण्यासारखं वागवलं तर... तुमचा पहिल्यांदा विश्वास बसणार नाही, पण हे प्रत्यक्षात घडलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 नोव्हेंबर :  जंगलात राहणारे बहुतेक प्राणी हे क्रूर आणि धोकादायक असल्यानं त्यांची जवळीक ही धोकादायक ठरू शकते.   सिंह हा तर जंगलाचा राजा असून, तो एक चांगला शिकारीसुद्धा आहे. त्यामुळेच प्राणी असो किंवा मनुष्य यांना घाबरवण्यासाठी सिंहा एकच डरकाळी पुरेशी असते. जंगलाच्या राजाला कुणी पाळीव प्राण्यासारखं वागवलं तर... तुमचा पहिल्यांदा विश्वास बसणार नाही, पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील twfeq या अकाउंटवरून शेअर केलेला व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एक महिला तिच्या हातात सिंहिणीला घेऊन जात असल्याचं दिसतंय. या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं महिलेनं सिंहिणीला तिच्या दोन्ही हातातं उचललं आहे, ते पाहिल्यानंतर कदाचित तुमचा तुमच्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण या व्हिडिओमध्ये ती  सिंहिणीला न घाबरता अगदी सहज दोन्ही हातांनी उचलतीय. विशेष म्हणजे सिंहिणीनंदेखील महिलेवर हल्ला केला नाही.

सिंहिणीसमोर महिला अगदी बिनधास्त वागताना दिसत आहे. दुसरीकडे, जंगलाची राणी असणारी सिंहीण या महिलेसमोर हतबल झालीय. ज्या सिंहिणीला पाहून अनेक लोकांना घाम फुटतो, त्याच सिंहिणीला ही महिला दोन्ही हातांनी उचलून रस्त्याच्या मधोमध चालताना दिसत आहे. महिला सिंहिणीला जबरदस्तीनं उचलून तिच्यासोबत घेऊन जात असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय. तर सिंहिण महिलेच्या हातामधून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

दिसताच क्षणी कुत्र्याने तोंडात धरला खतरनाक साप; असा भयानक शेवट की तुम्ही विचारही केला नसेल

सिंह की मांजर?

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना असं वाटेल की, महिलेनं हातात उचललेल्या सिंहिणीला पाळलं आहे. कारण लोक त्यांच्या पाळीव कुत्र्याशी किंवा मांजरीसोबत जसं वागतात, तसं सिंहिणीशी संबंधित महिला वागताना दिसतेय. व्हिडिओतील आश्चर्याची बाब म्हणजे, महिलेच्या जबरदस्तीनंतरही सिंहिणीनं महिलेवर हल्ला केला नाही. तसंच ती महिलेला कोणीतीही इजा करण्याचा प्रयत्न करताना दिसली नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असून चांगलाच चर्चेत आहे.

First published:

Tags: Video viral, Video Viral On Social Media