मराठी बातम्या /बातम्या /Viral /मुलाला भेटायला येणाऱ्या मित्राच्याच प्रेमात पडली महिला, नंतर घडलं असं काही....

मुलाला भेटायला येणाऱ्या मित्राच्याच प्रेमात पडली महिला, नंतर घडलं असं काही....

व्हायरल

व्हायरल

लग्न, प्रेम या गोष्टींविषयी लोक खूप गंभीर असतात. मात्र आजकाल बदलत्या जगानुसार अनेकजण याविषयीही प्रॅक्टिकल विचार करायला लागले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 19 मार्च : लग्न, प्रेम या गोष्टींविषयी लोक खूप गंभीर असतात. मात्र आजकाल बदलत्या जगानुसार अनेकजण याविषयीही प्रॅक्टिकल विचार करायला लागले आहेत. प्रेम आणि लग्न याविषयी निर्णय घेण्यासाठी लोक जास्त वेळही लावत नाहीत. याविषयी अनेक घटना समोर येत असतात. आपण विचारही करु शकत नाहीत अशा विचित्र, मजेशीर, हटके घटना समोर येत असतात. अशीच आणखी एक घटना सध्या चर्चेत आली आहे.

एक प्रकरण सध्या चर्चेत आहे जेव्हा अमेरिकेतील एका महिलेने आपल्या मुलाच्या मित्राशी लग्न केले आहे. महिलेचा मुलगा आणि त्याचा मित्र एकमेकांना भेटायला येत असताना हा सर्व प्रकार घडला. याच दरम्यान महिलेचे मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबंध जुळले होते. एवढेच नाही तर दोघांच्या वयातही खूप अंतर आहे.

हेही वाचा -   कोमोडो ड्रॅगनने हरणाला जिवंत गिळलं, शिकारीचा धक्कादायक Video समोर

हे संपूर्ण प्रकरण अमेरिकेतील ओहायो येथील असून महिलेचं नाव तान्या असल्याचं समोर आलं आहे. द सनच्या वृत्तानुसार, अलीकडेच महिलेने सोशल मीडियावर ही संपूर्ण कहाणी सांगितली आहे. यासोबतच महिलेने स्वतःचे आणि तिच्या पार्टनरचे काही फोटोही शेअर केले आहेत जे व्हायरल होत आहेत. महिलेचे वय 42 वर्षे आहे. सुमारे तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. जोसू असे या मुलाचे नाव असून त्याचे वय 24 वर्षे आहे. तान्या आणि जोसू 2018 मध्ये भेटले तेव्हा नात्यात आले. रिपोर्ट्सनुसार, तान्याला 12 आणि 14 वर्षांचे मुलगे आहेत आणि ते दोघे जोसूला भेटायला यायचे आणि तोही त्या महिलेच्या मुलांना भेटायला यायचा. याच काळात दोघांचे प्रेम झाले.

तान्या अनेक दिवसांपासून पतीपासून वेगळी राहत होती. जेव्हा लोकांना त्यांच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली तेव्हा ते भरपूर कमेंट करायचे. पण आता दोघांचेही लग्न झाले असून दोघेही त्यांचे रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. महिलेचा नवरा आता त्यांच्या दोन मुलांची काळजी घेतो आणि सर्वजण मित्र म्हणून राहतात. अशा अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत.

First published:

Tags: Love, Videos viral, Viral