कोलकाता, 11 डिसेंबर : दुतोंडी साप म्हणजे दोन चेहरे असलेला साप फार क्वचित आढळला जातो. त्याचा वापर अनेक अंधश्रध्दांसाठी केला जातो. असे म्हटले जाते की, दुतोंडी साप हा गुप्तधन ओळखण्यासाठी पकडला जातो. त्यामुळं दुतोंडी सापांची मोठ्या प्रमाणात तस्करीही करण्यात येते. मात्र पश्चिम बंगालमधील एका गावात चक्क कोट्यावधी रुपयांची किंमत असलेला हा साप दिसला मात्र त्याला पकडण्याऐवजी लोकांनी या सापाला दूध पाजले.
बेलदा फॉरेस्ट रेंजच्या इकरुखी गावात एक दोन तोंडाचा साप आढळला. जेव्हा गावातील लोकांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांनी त्या सापाला खायला घातले. लोक येऊन सापासोबत फोटो काढू लागले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदाच असा साप जंगलात दिसला. सापाला दूध पाजल्यानंतर सर्पमित्रांनी सापाला जंगलात सोडले. एकीकडे प्राण्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असताना, ग्रामस्थांनी मात्र या सापाला जंगलात सोडले. त्यामुशं सोशल मीडियावर या गोष्टीचे कौतुक केले जात आहे.
वाचा-लग्नानंतर अवघ्या वर्षभरात ही प्रसिद्ध अभिनेत्री घेतेय घटस्फोट, सांगितलं कारण
West Bengal: A two-headed snake found in the Ekarukhi village of Belda forest range. (10.12.19) pic.twitter.com/jLD4mPWhv8
— ANI (@ANI) December 10, 2019
वाचा-VIDEO: रोडसाईड रोमिओची महिला शिपायाकडून धुलाई, 27 सेकंदात 23 वेळा बुटाने हाणलं!
एएनआयने आज सकाळी या दुतोंडी सापाचे फोटो शेअर केले. आतापर्यंत 700 हून अधिक लाईक्स आणि 188 री-ट्वीट झाले आहेत. दरम्यान दुतोंडी सापाला आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधींची किंमत आहे. सापाच्या वजनानुसार त्याची किंमत ठरवली जाते. त्यात दुतोंडी साप दुर्मिळ असल्यामुळं त्यांचा अपयोग अनेक अंधश्रध्दांसाठी केला जातो.