मराठी बातम्या /बातम्या /Viral /झाडावर चढणारी 'स्कूटर'; जुगाड पाहून व्हाल थक्क, Video चर्चेत

झाडावर चढणारी 'स्कूटर'; जुगाड पाहून व्हाल थक्क, Video चर्चेत

व्हायरल

व्हायरल

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. त्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञानाच्या मदतीने लोक चांगली प्रगती करताना दिसत आहेत. अनेक नवनवीन गोष्टी तयार करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 24 मार्च : आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. त्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञानाच्या मदतीने लोक चांगली प्रगती करताना दिसत आहेत. अनेक नवनवीन गोष्टी तयार करत आहेत. अशा गोष्टींचा दैनंदिन जीवनात भरपूर उपयोगही होतो. याशिवाय अनेक जुगाडू लोकही आहेत जे काहीतरी हटके करण्याच्या प्रयत्न करतात. यांचे अनेक फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आणखी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आलाय. जो पाहून अनेकांना आनंद होईल.

उंचच उंच झाडावर चढण्याची अनेकांची इच्छा असते मात्र चढता येत नाही. आता ही तुमची इच्छाही पूर्ण होऊ शकते. असा एक जुगाड समोर आलाय ज्याने तुम्ही उंचच उंच झाडावर सहजरित्या चढू शकता. याविषयीचा एक जुगाडू व्हिडीओ समोर आलाय.

ग्रामीण भागात लोक झाडावर चढून नारळ किंवा खजूर काढण्याचा खूप प्रयत्न करतात. मात्र या अनोख्या यंत्राच्या मदतीने अशा उंच झाडांवर चढण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. बिजनेसमॅन हर्ष गोएंका यांनी त्यांच्या ट्विटरवर याविषयी व्हिडीओ शेअर केला आहे. हे जुगाडू यंत्र पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक माणूस झाडाला जोडलेल्या एका सायकलसारख्या मशीनवर बसला आहे. जुगाडामुळे हे यंत्र झाडावर अगदी सहजरित्या चढण्याचं काम करत आहे. हे पाहून अनेकजण आनंदी झालेत कारण आता त्यांना झाडावर चढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार नाही.

ही 'स्कूटर' तुम्हाला 30 सेकंदात 275 फूट (84 मीटर) उंच झाडावर चढू देते. या झाडावर चढणारी 'स्कूटर' कोणत्याही सरळ किंवा किंचित वाकलेल्या झाडावर किंवा खांबावर जाऊ शकते. हा व्हिडिओ 417k पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि त्याला खूप प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अनोखे तंत्रज्ञान पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि ज्या व्यक्तीने हा शोध लावला त्याचे कौतुक करतायेत. अनेकजण व्हिडीओ शेअर करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Social media viral, Top trending, Videos viral, Viral news