मुंबई, 12 डिसेंबर : मनुष्य आणि जनावरांमधील मैत्रीच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. दोघांच्या मैत्रीवर, प्राण्यांच्या एकनिष्ठतेबद्दल अनेक कथा, सिनेमे प्रसिद्ध आहेत.मनुष्याचा सर्वात जवळच्या प्राणी मित्रांपैकी एक आहे हत्ती. हत्ती (Elephant) दिसायला भव्य असला तरी त्याचं आणि मनुष्याचं अगदी जवळचं आणि घट्ट नातं असतं. सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Viral) झालाय. हा व्हिडीओ पाहणाऱ्या सर्वांच्या ओठावर ‘हाथी मेरे साथी’ हा एकच शब्द आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कोणत्या भागातला आहे, हे समजलेलं नाही. या व्हिडीओत एक ट्रॅक्टर चिखलाच्या दलदलीत फसला होता. ड्रायव्हरनं ट्रॅक्टरला बाहेर काढण्याचे जोरदार प्रयत्न केले, मात्र ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
ड्रायव्हरचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यानं अखेर ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी हत्तीची मदत घेण्यात आली. चिखलाच्या दलदलीत फसलेला ट्रॅक्टर बाहेर काढणं प्रशिक्षित ड्रायव्हरला जमलं नव्हतं. त्यामुळे हत्तीला देखील ते लवकर जमणार नाही. त्यासाठी त्याला जोर लावावा लागेल, असाच सर्वांचा अंदाज होता.
चिखलात अडकलेला तो ट्रॅक्टर हत्तीनं अगदी सहज बाहेर काढला. हत्तीचं ते कौशल्य पाहून ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरसह सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते. त्यांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला.
ज़रूरत पड़ने पर सच्चे दोस्त ही काम आते हैं... pic.twitter.com/u0V3DETTjX
— Dipanshu Kabra (@ipskabra) December 11, 2020
हे वाचा-रेल्वेचे खाजगीकरण होऊन प्रवाशांना मिळणाऱ्या या सुविधा बंद होणार?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर अगदी कमी कालावधीमध्ये तो व्हायरल झाला आहे. अनेक युझर्सनं तो शेअर केला असून त्यावर भरपूर प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.