Home /News /viral /

भरदिवसा घरासमोर व्यक्तीच्या गळ्यातील Chain Snatching करीत चोर फरार; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

भरदिवसा घरासमोर व्यक्तीच्या गळ्यातील Chain Snatching करीत चोर फरार; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

नेमकी संधी साधत चोर बाईकवरुन तेथे आला आणि...पाहा VIDEO

    हरियाणा, 13 ऑक्टोबर : कोरोनामुळे (Corona Virus) लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींनी तर कसे-बसे दिवस काढले. मात्र यादरम्यान गुन्हेगारी वाढल्याचं दिसून येत आहे. त्यातही चोरी, दरोडे यांसारख्या घटना वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधित सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. दरम्यान सोनसाखळी चोराचा एक धक्कादायक व्हिडीओ (A shocking video of a gold chain thief) समोर आला आहे. या व्हिडीओत (Video Viral) तुम्ही पाहू शकता की, चोर चोरी करण्याची तयारी कशी करतात. हरियाणातील टोहाना भागात अशीच एक सोनसाखळी चोरी झाली आहे. येथे दोन अज्ञात बाईक स्वार भर दिवसा एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून घेऊन गेले. साधारण 6.30 वाजता किला मोहल्ला वार्ड नंबर 8 येथे हा प्रकार घडला. घटनेच्या वेळी व्यक्ती आपल्या घराबाहेर असलेल्या नळाला पाण्याची तोटी लावत होता. त्यावेळी अज्ञात बाईक स्वार आले. (A thief escapes by snatching a chain around a persons neck in front of the house all day VIDEO see exactly how the innings was formed) हे ही वाचा-बिबवेवाडी कबड्डीपटूची हत्या करणारा गजाआड, 12 तासांतच आरोपीच्या आवळल्या मुसक्या त्यांनी आधी आजूबाजूला पाहिलं आणि कोणीही आपल्याकडे पाहत नसल्याचं पाहून त्यांनी उलट्या दिशेने चेहरा करून बसलेल्या व्यक्तीच्या गळ्याचील चेन खेचून घेतली आणि बाईकवरुन बसून फरार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांनी तपास सुरू केला आहे. पीडित वीरभान हे किला मोहल्ला वॉर्ड नंबर 8 चे निवासी आहेत. सकाळी साधारण 6.30 वाजता ते आपल्या घराबाहेरील नळाला पाण्याची तोटी लालत होते. त्यावेळी हा प्रकार घटला. चोरीच्या घटनेनंतर ते चोरांच्या मागे धावत होते. मात्र ते रस्त्यात पडले. यानंतर घरातील काही सदस्य धावत बाहेर आले. मात्र तोपर्यंत चोर बाईक घेऊन फरार झाले होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Shocking viral video

    पुढील बातम्या