नवी दिल्ली, 27 मे : जगभरात अनेक मंदिर आहेत. प्रत्येक ठिकाणी मंदिराचे वेगवेगळे नियम, परंपरा आहेत. वेगवेगळ्या मान्यतेनुसार मंदिरं असून त्यांची स्वतःची अशी वेगळी कथा आहे. तुम्ही मंदिरात गेल्यावर तुम्हाला प्रसाद मिळत असेलच. प्रत्येक मंदिरात वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद मिळतात. मात्र असंही एक मंदिर आहे जिथे प्रसाद म्हणून चहा दिला जातो. तुम्ही याविषयी कधी ऐकलंय का? नसेल तर हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
केरळमधील कन्नूरमध्ये एक मंदिर आहे, जिथे देवतेला चहा दिला जातो. या मंदिराचे नाव मुथप्पन मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या भव्यतेसाठी आणि सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या अत्यंत अनोख्या परंपरेमुळे त्याची ख्याती दूरवर आहे. पण ते सर्वात प्रसिद्ध आहे ते त्याच्या प्रसादामुळे.
हे मंदिर वलपट्टनम नदीच्या काठावर बांधले आहे. या मंदिरात मुथप्पनची पूजा केली जाते. तो एक लोक देव आहे आणि भगवान विष्णू आणि शिव यांचा अवतार मानला जातो. येथे मुगाच्या डाळीचा चाट आणि चहा प्रसाद म्हणून देवाला अर्पण केला जातो.
हेही वाचा - नाश्त्याच्या पैशावरून गोंधळ; तीन महिलांनी मिळून तरुणीला चोप चोप चोपलं, पाहा Video
र्शनानंतर हा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो. हा प्रसाद खाण्यासाठी लांबून लोक येतात. त्याची चव खूप अनोखी आहे. मंदिर परिसरात दररोज शेकडो लिटर दुधाचा चहा बनवला जातो. मंदिरात येणाऱ्या भाविकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. मंदिरातील सर्व भाविकांना येथे मोफत राहण्यासाठी जागा दिली जाते. या मंदिरात दुरून लोक येतात. अशा परिस्थितीत ते बाहेर राहण्याऐवजी मंदिर परिसरात बांधलेल्या खोल्यांमध्ये राहू शकतात.
हे मंदिर आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी या मंदिरात एक प्रकारचे नृत्य आयोजित केले जाते. याला थियाम म्हणतात. ते पाहण्यासाठी अनेक लोकही येतात. पण या मंदिराचा चहा इतर सर्व गोष्टींना फिका पाडतो. या चहाची चव खूपच अनोखी आहे. हा चहा प्यायला मंदिरात लोकांची गर्दी होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kerala, Religion, Viral, Viral news